शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सोशल डिस्टसिंग : फळांची व्रिकी शेतकरी ते थेट ग्राहक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 16:48 IST

प्रशासनाच्या मदतीने शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून मेहकर येथे टरबूज, द्राक्ष या फळांची विक्री करण्यात येत आहे. 

 मेहकर: कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असून याचा फटका व्यापारी, उद्योगधंदे, छोटे व्यावसायिक यांच्यासह शेतकºयांनाही बसला आहे.  अशा परिस्थितीत प्रशासनाच्या मदतीने शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून मेहकर येथे टरबूज, द्राक्ष या फळांची विक्री करण्यात येत आहे. कोरोनामुळे देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. शेतकºयांच्या शेतात  उत्पादित केलेला माल हासुद्धा शेतातच तर काहींच्या घरी पडून आहे. यामध्ये सर्वात जास्त नुकसान भाजीपाला व फळपिके उत्पादन घेणाºया शेतकºयांच्या होत आहे. तालुक्यात वांगी, कोबी, टोमॅटो,भेंडी, कारले या भाजीपाला पिकासह  संत्रा, टरबूज, खरबूज, पपई, द्राक्ष या फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. सध्या प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा बंद असल्यामुळे हा उत्पादित झालेला भाजीपाला व फळपिके इतर बाजारपेठेत नेणे शक्य होत नाही. सध्या भाजीपाला हराशी सुध्दा बंद आहे. त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहेत. संचारबंदीमध्ये जीवनावश्यक वस्तूंसाठी मेहकर उपविभागीय अधिकारी यांनी सकाळी सात ते अकरा पर्यंत वेळ दिली असल्याने परिसरातील शेतकरी प्रशासनाच्या मदतीने थेट ग्राहकांना आपला माल विक्री करीत आहेत. तालुक्यातील आंध्रुड येथील शेतकरी उध्दव नारायण देशमुख यांनी शेतात लागवड केलेले टरबूज पीक ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये आणून मेहकरला विक्री केले. शेतातले टरबूज थेट ग्राहकांना विक्री केले असून मंगळवारी चार टन एवढ्या मालाची विक्री केली आहे. त्याचप्रमाणे लोणार येथील अनिल दूधमोगरे यांनी त्यांच्या शेतातील तीन क्विंटल द्राक्ष विक्रीसाठी मेहकर येथे आणले होते. स्थानिक बालाजी नगर, नरहरी महाराज चौक, विठ्ठल नगर येथे तीन क्विंटल द्राक्षांची विक्री त्यांनी शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी सत्येंद्र चिंतलवाड,  कृषी सहाय्यक विवेक शिरसाट, मनोहर वैराळ, बबन बोर्डे, विलास काळे, प्रदिप खंडारे यांचे सहकार्य शेतकºयांना मिळाले. (प्रातिनिधी) 

शेतकºयांनी उत्पादित केलेल्या फळपिकांना कोरोन या संकटामुळे अडचणीचे दिवस आले आहेत. मात्र अशा परीस्थित सोशल डिस्टसिंगचे पालन करुन व प्रशासनाच्या कोरोना बाबतच्या सुचनेचे काटेकोर पालन करीत शेतकºयांनी शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून फळपिकाची विक्री केली.-विलास काळे, कृषी सहाय्यक, मोळा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी