शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भटक्या विमुक्तांचा निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 14:04 IST

बुलडाणा : भटक्या विमुक्तांवरील अन्यायाच्या विरोधात ६ आॅगस्ट रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देअन्याय अत्याचाराविरोधात बहुजन भटके विमुक्त समाजाने एकीने संघर्ष केला पाहिजे यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. दुपारी गांधी भवन येथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला.

बुलडाणा : भटक्या विमुक्तांवरील अन्यायाच्या विरोधात ६ आॅगस्ट रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. गेल्या काही वर्षांपासून देशामध्ये अराजकता निर्माण झाली आहे. भटके विमुक्तांसह बहुजन समाजावर अन्याय अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. संविधानाने दिलेले मौलिक हक्क, अधिकारी संपुष्टात आणण्याचे षडयंत्र ही व्यवस्था करीत आहे. अन्याय अत्याचाराविरोधात बहुजन भटके विमुक्त समाजाने एकीने संघर्ष केला पाहिजे यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. दुपारी गांधी भवन येथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. प्रमुख मान्यवरांनी मार्गदर्शनपर विचार मांडले. धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथील नाथपंथी डवरी गोसावी समाजातील पाच जणांची मुले पळविणाºया टोळीच्या संशयावरुन निर्घुण हत्या करणाºयांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, जळगाव जामोद तालुक्यातील मोहिदेपूर येथील चौघांना चोरीच्या संशयावरुन नागपूर येथे ठार करणाºयांना शिक्षा झालीच पाहिजे, नारायण गाव, पुणे येथे कैकाडी समाजावर भ्याड हल्ला करुन उपजिविकेचे साधन नष्ट करणाºयांना शिक्षा झालीच पाहिजे, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील कोमल पवार या वडार जातीच्या मुलीवर अत्याचार करुन खून करणाºयांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथील ८१ आर जागा त्वरित देण्यात यावी, देऊळगावराजा येथील पिंपळगाव चिलमखा येथील २५ वर्षांपासून रहिवाशी असलेल्या भटके विमुक्तांना कायम भाडेतत्व, कर पावती व घरकूल देण्यात यावे, गृह चौकशी अहवालांतर्गत भटक्या विमुक्तांना जातीचा दाखला देण्यात यावा, इव्हीएम मशीन बंद करुन बॅलेट पेपरवर निवडणूका घ्याव्यात, भटक्या विमुक्तांची जाती आधारित जनगनणा करुन त्यांना संख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे, समस्त भटके विमुक्त व नाथजोगी डवरी गोसावी भराडी समाजाला अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अंतर्गत संरक्षण देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी कुणाल पैठणकर, समाधान कुºहाळकर, कैलास सुरडकर, नाथा शेगर, प्रशांत सोनुने, दामोद बिडवे, प्रशांत तेलंग, भगवान सावंत, नारायण शिंदे, गणेश चव्हाण, नितेश पवार, शंकर शितोळे, शिवाजी शेगर, सुभाष शेगर, वंदना पवार, शंकर शेगर, विश्वनाथ शेगर, मच्छिंद्र शेगर, माणिक शेगर, ओंकार शिंदे, उत्तम शिंदे, पंजाब चव्हाण, भानुदास पवार, विश्वनाथ शिंदे, आेंकार चव्हाण, सुनील यदमळकर, गोविंदा येदमळकर, किसन शितोळे, शंकर शितोळे, विजय मंडाळकर, रमेश शिंदे, अशोक मंडारकर, मुंगनाथ शिंदे, नाना बाबर, दिलीप जाधव, बापु शेगर, प्रकाश शेगर, रेखा जाधव, लता मोहिते, हवसाबाई मोहिते, जगदिश मोहिते यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBuldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयagitationआंदोलन