शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘रिदास’कडून ७० लाखाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 11:29 IST

Buldhana Crime News गुंतवणूकदारांची ७० लाखाहून अधिक रुपयांनी फसवणूक केल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जादा परताव्याचे आमिष दाखवून बंगळुरू येतील रिदास कंपनीच्या मालक तथा व्यवस्थापक व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची ७० लाखाहून अधिक रुपयांनी फसवणूक केल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. दरम्यान गेल्या एक वर्षापासून कंपनीचा मालक व त्यांचे सहकारी फरार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले आहे.बुलडाणा शहरातील टीपू सुलतान चौकात राहणारे मोहम्मद साजीद अब्दुल हसन देशमुख यांनी त्यांच्या कुटुंबियांनी बंगळुरूच्या रिदास कंपनीत ११.५० लाख रुपये जादा परताव्याच्या अनुषंगाने गुंतवले होते. त्यानंतर याच परिसरातील आणखी काही जणांनी जवळपास १६ लाख गुंतवल्याचे प्रकरण समोर आले होते. मात्र कंपनीचे मालक तथा संचालक मोहम्मद अय्युब हुसैन व मोहम्मद अनिस आयमन त्यांना दाद देत नसल्याने संबंधितांनी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात २७ आणि २८ ऑक्टोबर २०२० रोजी तक्रार दिली होती. प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.तपासात संबंधीत कंपनीचे मालक, संचालक हे जवळपास एक वर्षापासून फरार असल्याचे समोर आले. सोबतच मुंबई, अैारंगाबाद येथेही एक वर्षापूर्वी प्रकरणात गुन्हे दाखल झालेले असल्याचे समोर आले होते. बुलडाणा शहरातील दोन जणांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर अनेक जणांना असेच जादा परताव्याचे अमिष दाखवून रिदास कंपनीच्या मालक व संचालकांनी कंपनीत पैसे गुंतवून घेतले होते. मात्र ना परतावा मिळाला ना मुळ रक्कम परत मिळाली. त्यामुळे बुलाडणा शहरासह नजीकच्या भागातील अनेकांनी पोलिसात धाव घेवून तक्रार देण्यास प्रारंभ केला आहे. शहर पोलिस संबंधितांच्या कागदपत्रांची तपासणी करून संबंधीत प्रकरणे एकत्रीत करत आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी