शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

तीन अपघातात चार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 21:52 IST

उमरखेड, महागाव तालुक्यातील अंबोडा आणि आर्णी तालुक्यातील दत्तरामपूर येथे झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार झाले, तर तीन जण जखमी झाले. या तिन्ही घटना गुरुवारी घडल्या.

ठळक मुद्देसात जखमी : उमरखेड, महागाव, आर्णी तालुक्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड/महागाव/आर्णी : उमरखेड, महागाव तालुक्यातील अंबोडा आणि आर्णी तालुक्यातील दत्तरामपूर येथे झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार झाले, तर तीन जण जखमी झाले. या तिन्ही घटना गुरुवारी घडल्या.महागाव तालुक्यातील अंबोडा बसस्थानकानजीक दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. त्यांच्या मधात आॅटोरिक्षा सापडला. या अपघातात ट्रकचालक राम मुकिंदा भोसले जागीच ठार झाला. तर आॅटोरिक्षातील गजानन दिगांबर बसवंते (३२) रा.करंजी ता.महागाव यांचा दवाखान्यात नेताना मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले. शे.शादूल हुसेन शेख रा.शिरूड ताजबाग ता.अहमदपूर जि.लातूर, राम भोसले आणि गजानन बोजावते अशी जखमींची नावे आहेत. महागाव-यवतमाळ मार्गावरील अंबोडा बसस्थानकानजीक हा भीषण अपघात घडला. ट्रक (क्र.एम.एच.२४/एफ-९१११) आणि दुसरा ट्रक (क्र.एम.एच.२४/ए.यू.-४७३३) यांची समोरासमोर धडक झाली. यात दोन जण जागीच ठार झाले. जखमी तिघांना उपचारार्थ हलविले आहे.आर्णीनजीक दत्तरामपूर येथे आयशर वाहनाने (क्र.एम.एच.१३/ ए.एक्स-४५६२) आॅटोरिक्षाला (क्र.एम.एच.२९/व्ही.८९०८) धडक दिली. यातील सुनीता काळे, अनंता काळे, कीर्ती काळे, अजय काळे, संतोष काळे सर्व रा.लोणी हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच आर्णी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ते जखमींना आॅटोरिक्षातून बाहेर काढत असतानाच समोरून येणाऱ्या ट्रेलरने (क्र.एम.एच.३१/सी.बी.७६०४) त्यांना धडक दिली. या अपघातात ऋषी इंगळे व जमीर पठाण जखमी झाले. आॅटोतील जखमी अजय अनंतराव काळे यांचा उपचारादरम्यान यवतमाळ येथे मृत्यू झाला. या प्रकरणी आयशर चालक अभिजित दिलीप साळुंके (२६) रा.काटेसावरगाव जि.उस्मानाबाद आणि ट्रेलर चालक मुकेश कलिदेव रामटेके (३५) रा.टेकडी ता.मुल जि.चंद्रपूर यांच्याविरुद्ध आर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.महिलेला बसने चिरडलेउमरखेड येथे पुसद रोडवरील शासकीय रुग्णालयासमोर स्कुटीवरील महिलेचा तोल गेला. मागून येणाºया बसखाली (क्र. एम. एच.४० / एन.९८५६) ही महिला चिरडली गेली. त्यात शीला सुभाष पेन्शनवार (५०) यांचा जागीच मृत्यू झाला. त्या मुलीसह स्कुटीने जात असताना हा अपघात घडला.

टॅग्स :Accidentअपघात