शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर-कारच्या धडकेत अकोल्यातील चौघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 19:33 IST

अपघातग्रस्त कार अकोल्याकडे तर कंटेनर खामगावकडे येत होता.

ठळक मुद्देकार क्रमांक एमएच-२७, एआर-३६३२ अकोल्याकडे जात होती.कंटेनर क्रमांक आरजे-१८ जीबी-२५८९ या वाहनाने जोरदार धडक दिली.त्यामध्ये कारमधील चौघे जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी आहे.

खामगाव : राष्ट्रीय महामार्गावर कोलोरी गावानजिक गव्हाण फाट्याजवळ कंटेनरच्या धडकेत कारमधील चार जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली. अपघातग्रस्त कार अकोल्याकडे तर कंटेनर खामगावकडे येत होता. जखमीला उपचारासाठी खामगावात आणण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार क्रमांक एमएच-२७, एआर-३६३२ अकोल्याकडे जात होती. त्याचवेळी खामगावकडे भरधाव येणाºया कंटेनर क्रमांक आरजे-१८ जीबी-२५८९ या वाहनाने जोरदार धडक दिली. त्यामध्ये कारमधील चौघे जागीच ठार झाले. तर एक गंभीर जखमी आहे. मृतकांमध्ये अकोल्यातील शिवनगर भागातील विनोद शंकरराव बावणे वय-५०, पप्पू मनोहर जोशी वय-४५, अतुल शंकरराव व्यवहारे वय-४७, राहुल सातळे-४० यांचा समावेश आहे. तर अनिल मावळे नामक व्यक्ती गंभीर जखमी आहे. उपचारासाठी त्यांना खामगाव उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त कारचालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शियांनी सांगितले. अपघात एवढा भीषण होता की कारमधील मृतदेह गॅसकटरच्या साह्याने पत्रे कापून बाहेर काढण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे हेकॉ. खर्चे, जावेद शेख, गवई, खोले यांनी घटनास्थळावर धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले.

टॅग्स :AkolaअकोलाkhamgaonखामगावAccidentअपघात