नांदुरा (बुलडाणा): जुगार खेळत असताना चार जणांना पकडून त्यांच्याकडून रोख १८00 रु पये व जुगार साहित्य नांदुरा पोलिसांनी जप्त केले. सदर कारवाई पोलिस कॉन्स्टेबल विजय गोलाईत यांनी ८ नोव्हेंबरच्या दुपारी ४ वाजता येथील काळी- िपवळी थांब्यावर केली. येथील गणी पंपाजवळील काळी-पिवळी थांब्यावर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी छापा मारला. यावेळी सचिन वाघ, सचिन हागे, सचिन जगदाळे व गणेश सारोकार (रा. नांदुरा) हे एक्का-बादशाह हा जुगार खेळताना मिळाले. त्यांच्याकडून नगदी १८00 रुपयेव ताशपत्ता जप्त करुन त्यांच्यावर जुगार अँक्टनुसार कारवाई करून अटक केली. शहरात अनेक ठिकाणी जुगाराचे अड्डे चालू आहेत.
चार जुगारी रंगेहात पकडले
By admin | Updated: November 9, 2014 23:17 IST