शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर : अँल्युमिनियम तार चोरी प्रकरणातील चारही आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:21 IST

मेहकर : तालुक्यातील सोनाटी शिवारामधून ९ डिसेंबरच्या रात्रीला अँल्युमिनियमची जवळपास २0 लाख रुपये किमतीची तार चोरीला गेली होती. यासंदर्भात पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आपली तपास चक्रे फि रुन २१ डिसेंबर रोजी चार आरोपींना अटक केली आहे.

ठळक मुद्देदोन वाहनांसह सोळा लाखाचा माल जप्त आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : तालुक्यातील सोनाटी शिवारामधून ९ डिसेंबरच्या रात्रीला अँल्युमिनियमची जवळपास २0 लाख रुपये किमतीची तार चोरीला गेली होती. यासंदर्भात पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आपली तपास चक्रे फि रुन २१ डिसेंबर रोजी चार आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन वाहनांसह तारांचे बंडल व अन्य साहित्य मिळून सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चारही आरोपींना २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोनाटी शिवारामध्ये टॉवरचे काम सुरू आहे. ९ ते दहा डिसेंबर दरम्यान तेथून २0 टन वजनाचे अँल्युमिनियम तारांचे पाच बंडल चोरट्यांनी लंपास केले होते. २0 लाख रुपये त्यांची किंमत होती. जालना येथील जसवंतसिंह रामसिंह यांनी मेहकर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली होती. मेहकरचे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी या प्रकरणात तपास करीत पोलीस उपनिरीक्षक प्रदीप आढाव, पोलीस निरीक्षक  शरद गिरी, अशोक म्हस्के, उमेश घुगे, पोलीस कॉन्स्टेबल प्रताप बाजड, अनिल काकडे यांच्या चमूला तपास कामी  पाठवले होते. तपासात या चमूने  आरोपी संतोष ऊर्फ  देवराव भीमराव देशमुख (सरकटे) (रा. एकांबा, तालुका मालेगाव ह.मु.आडसावंगी नाशिक), गणेश  काकडे (रा. एकांबा ता. मालेगाव, जि. वाशिम), शरद  मेहेत्रे (२५ रा.भिवापूर, ता. मेहकर), संदीप हरिशचंद जाधव (२६ रा. सारोळा मांडवा, ता. वाशी , जि. उस्मानाबाद) या आरोपिंना वेगवेगळय़ा ठिकाणावरुन अटक केली. त्यांना न्यायालयाने २७ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत. 

साहित्य केले जप्त आरोपींकडून पोलिसांनी ट्रक क्रमांक एचआर-५५-९१0६ आणि एमएच-१३-आर-४६८९ ही दोन वाहने जप्त केली आहेत. अनुक्रमे दहा लाख आणि दोन लाख रुपये अशी त्यांची किंमत आहे. अँल्युमिनियमची पॉवर ग्रेडची ३३ एमएम गेजची तार  ही चार लाख रुपये किमतीची आहे. असा एकूण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी आरोपींकडून जप्त केला आहे.

टॅग्स :Mehkar Bypassमेहकर बायपासCrimeगुन्हाArrestअटक