शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रवी देवांग यांचे शेगावात निधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:31 AM2017-12-13T01:31:19+5:302017-12-13T01:38:41+5:30

खामगाव : शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रवी देवांग यांचे शेगाव येथे हदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी १२ डिसेंबरला रात्री ८ वाजता निधन झाले. 

Former State President of Farmer's Association Ravi Deang passed away in Shegaon | शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रवी देवांग यांचे शेगावात निधन 

शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रवी देवांग यांचे शेगावात निधन 

Next
ठळक मुद्देशेगाव येथे मंगळवारी दुपारी शेतकरी मेळावा आयोजीत करण्यात आला होतादेवांग यांनी सुद्धा शेतकरी बांधवासोबत संवाद साधून संघटनेची भूमिका स्पष्ट केली

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रवी देवांग यांचे शेगाव येथे हदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी १२ डिसेंबरला रात्री ८ वाजता निधन झाले. 
शेगाव येथे मंगळवारी दुपारी शेतकरी मेळावा आयोजीत करण्यात आला होता. या मेळाव्याला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल धनवट, कार्याध्यक्ष गोविंद जोशी, माजी आमदार वामनराव चटप, सरोजताई काशीकर आदी पदाधिकार्‍यांनी हजेरी लावली होती. शेतकर्‍यांच्या समस्यांवर या मेळाव्यात चर्चा झाली. माजी प्रदेशाध्यक्ष रवी देवांग यांनी सुद्धा शेतकरी बांधवासोबत संवाद साधून  संघटनेची भूमिका स्पष्ट केली. मेळावा आटोपल्यानंतर रवी देवांग  इतर कार्यकर्त्यांसोबत शासकीय विश्रामगृहावर पोहचले. त्यांना धुळे येथे रात्री ९ वाजता निघायचे होते. त्यामुळे काहीवेळ त्यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करायला सुरवात केली. चर्चा सुरु असतांनाच अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागले. कैलास फाटे यांच्यासह स्थानिक शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलवले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मेळाव्याला आलेल्या एका ज्येष्ठ पदाधिकार्‍याच्या अकाली निधनामुळे संघटनेचे पदाधिकारी शोकाकूल झाले. 

Web Title: Former State President of Farmer's Association Ravi Deang passed away in Shegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.