शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

आगीच्या घटना रोखण्यासाठी वनविभाग 'अलर्ट मोड'वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 11:10 IST

Forest Department on alert mode मार्च महिन्याच्या प्रारंभापासून जिल्ह्यातील जंगलांना आग लागल्याचे  पाच ते सात घटना समोर आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील प्रादेशिक व वन्यजीव विभागाच्या अखत्यारित असलेल्या जंगलाचे आगीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान यातील बहुतांश आगी या प्रतिशोधातून लावण्यात येत असल्याचा वनविभागाचा संशय आले. त्यामुळे सध्या वनविभागाने कर्मचाऱ्यांना अलर्ट जारी केला असून विनापरवानगी गैहजर राहणाऱ्यांवर थेट कारवाईचा बडगा उचलण्यास प्रारंभ केला आहे.दरम्यान, अशाच एका प्रकारत एका वनपालासही निलंबीत करण्यात आले असल्याची माहिती वनविभागातील सुत्रांनी दिली आहे. दरम्यान काही संशयीत व्यक्तीही सध्या वनविभागाच्या रडारवर असून त्यादृष्टीने वनविभाग सध्या तपास करत आहे.मार्च महिन्याच्या प्रारंभापासून जिल्ह्यातील जंगलांना आग लागल्याचे  पाच ते सात घटना समोर आल्या. यात नेमके किती नुकसान झाले याचे सध्या वन विभाग आकलन करत असले तरी एक हजार हेक्टरपेक्षा अधिक नुकसान एकट्या ज्ञानगंगा अभयारण्यात झाल्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने बुलडाणा आणि मोताळा रेंजमध्ये येत असलेल्या अजिंठा पर्वत रांगा, ज्ञानगंगा अभयारण्यातील माटरगाव परिसरात काशीनळकुंड, बुलडाणा शहरा नजीकचा राजूर घाट, नळकुंड, दाभा, बिरसिंगपुर पळसेखड नाईक, पाडली आणि सातपुडा पर्वत रागांमधील जंगलांना ही आग लागली होती. ज्ञानगंगा अभयारण्यातील लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास दोन दिवस यंत्रणेला धावपळ करावी लागली. अंजिठा पर्वत रांगात लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी रात्री अग्नीरक्षकांना मोठी कसरत करावी लागली होती.

मेळघाटचा फायर सेल सक्रियमेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत असलेला फायर सेलही आता सक्रिय झाला आहे. सोबतच फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाकडूनही वन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना  थेट अलर्ट जात असून आग लागलेल्या ठिकाणाचा नकाशा व स्थितीचीही माहिती दिल्या जात आहे.  ज्ञानगंगा अभयारण्यात आगीच्या प्रतिबंधासाठी ५७ अग्नीरक्षक ब्लोअर यंत्रासह अन्य साधनसामुग्रीने सध्या सज्ज आहे. बऱ्हाणपुर डीएअेा कार्यालयाशीही समन्वय ठेवण्यात येत आहे.

प्रतिशोधातून आगीच्या घटनाजिल्ह्यातील जंगलांना प्रतिशोधातून आगी लावल्या जात असल्याचे प्रादेशिक वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. फेब्रुवारी महिन्यात जळगाव जामोदमध्ये डिंकाच्या तस्करी प्रकरणात कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी वनविभागाला बघून घेण्याच्या धमक्याही दिल्या गेल्या होता. त्यानुषंगाने सध्या वनविभाग अलर्ट आहे. आगीच्या घटना अशाच काही प्रकरणातून झाल्या असाव्यात अशी शंका अधिकारी व्यक्त करत आहेत.

वनविभागाची यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच जंगला लगतच्या गावातील शेतकऱ्यांची कार्यशाळा घेवून त्यांनी कोणती सतर्कता बाळगावी याची कल्पना देण्यात येत आहे. आग रोखण्यासाठी लोकसहभाग ही वाढविण्यावर भर देत आहोत.- अक्षय गजभिये, जिल्हा उपवनसंरक्षक, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाforest departmentवनविभागdnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्यfireआग