शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नामांकित कंपन्यांच्या बियाण्यासोबत इतर बियाणे, खते खरेदीची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 11:47 IST

Agriculture Sector News : कोरोना संकट काळात शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचे ‘लोकमत’च्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये आढळून आले.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : खरीप हंगामातील पेरणीच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना इतर कंपन्यांची बियाणे आणि खते खरेदी करण्याची सक्ती विविध कृषी केंद्रावरून केली जात आहे. त्यामुळे खामगाव आणि परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले असून, याकडे कृषी विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. कृषी विभागाची भरारी पथके नावालाच असल्याने, कोरोना संकट काळात शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचे ‘लोकमत’च्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये आढळून आले.पावसाळा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीची तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते व कीटकनाशकांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. ही संधी साधत काही कृषी केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांना नामांकित कंपन्यांच्या बियाण्यांसोबत इतर बियाणे आणि खते खरेदीची सक्ती करीत आहेत. 

तरच मिळतात बियाणे!  महाबीजच्या बियाण्यांसोबतच इतर कंपनीची बियाणे आणि खते, किटकनाशक खरेदीस नकार दिला. तर शेतकऱ्यांना कपाशीची बियाणे दिली जात नाही. त्याचवेळी दुसऱ्या कंपनीचे बियाणे आणि खत खरेदी केल्यास, तत्काळ बियाणे उपलब्ध होत असल्याचे प्रकार उजेडात येत आहेत. 

महाबीजच्या कपाशी बियाण्यांंसोबतच इतर कंपनीची बियाणे आणि खरेदीस संमती दिली. त्यावेळी बियाणे उपलब्ध होते. मात्र, खत आणि इतर कंपनीचे बियाणे खरेदीस नकार दिला. त्यावेळी कृषी केंद्र संचालकाने बियाणे देण्यास नकार दिला. -प्रमोद सावरकरशेतकरी, भालेगाव बाजार, ता. खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी