शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शाळेतून साहित्य खरेदीसाठी सक्ती; पालकांनो सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 16:43 IST

शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझाडे यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना दिला. 

बुलडाणा: शालेय साहित्य, गणवेश व इतर कुठल्याही वस्तू आपल्याच शाळेतून घेण्याची सक्ती होत असेल तर पालकांनी वेळीच सावधानता बाळगणे गरजेचे आहे; अशा कुठल्याही प्रकारची शालेय साहित्य खरेदीची सक्ती शाळेला करता येत नाही. आपल्याच शाळेतून शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांना वेठीस धरणाºया शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझाडे यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना दिला. शैक्षणिक क्षेत्रात कॉन्व्हेंट संस्कृतीने आपले पाय घट्ट रोवले आहेत. पालकांचा इंग्रजी शाळांकडे वाढता कल पाहून गावोगावी कॉन्व्हेंट व सीबीएसई माध्यमाच्या शाळा उघडण्यात आल्या आहेत. शहरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित अनेक संस्था सुरू आहेत. खाजगी शाळांचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले आहेत. सध्या अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित, कायम विनाअनुदानित, खासगी प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशप्रक्रिया वेगात सुरू आहे. अनेक शाळांकडून प्रवेश देतानाच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी सांगितले जाते. परंतू काही शाळा वह्या पुस्तकांसह गणवेश लेखनसाहित्य अशा विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य आपल्याच शाळेतून खरेदी करण्यासाठी सक्ती करत आहेत. त्यामुळे पालकांवर आर्थिक भुर्दंड पडत आहे. आपल्याच शाळेतून किंवा आपण सांगितलेल्याच दुकानातून  शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती ज्या शाळांकडून केली जात असेल, अशा शाळांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझाडे यांनी दिला आहे.  शेगावातील ‘त्या’ शाळाही रडारवरशेगाव शहरातील व तालुक्यातील काही संस्थामध्ये पालकांना शालेय साहित्य आपल्याच शाळेमधून खरेदी करण्याची सक्ती केल्या जात आहे. त्यावर काही पालकांनी गटशिक्षणाधिकाºयांकडे तक्रार केलेली आहे. त्यानुसार गटशिक्षणाधिकाºयांनी शैक्षणिक संस्थांना पत्र पाठविलेले आहे. परंतू तरीसुद्धा शाळेकडून पालकांची सर्रास लूट सुरू आहे. शेगावातील अशा काही शाळा शिक्षण विभागाच्या रडारवर असून लवकरच नियम मोडणाºया शाळांवर कारवाई होईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी पानझाडे यांनी दिली आहे. 

 शालेय साहित्य आपल्याच शाळेतून किंवा शाळेने सांगितलेल्या दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती होत असले, तर त्या शाळांवर शिस्तभंगाची कारवाई, मान्यता रद्द करणे, शाळेवर दंड ठोकावणे अशी कारवाई करण्यात येईल. वेळ पडल्यास अशा शाळांची आरटीईची मान्यता रद्द करण्याची शिफारस शासनास पाठविण्यात येईल. - डॉ. श्रीराम पानझाडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा