शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात पाच लघुपाटबंधारे प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 11:13 IST

बुलडाणा तालुक्यातील मातला, करडी, पळसखेड भट, कव्हळा ता. चिखली, तांबोळा ता. लोणार आदींचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. कुठे तुरळक, तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढला आहे. १७ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील पाच लघु पाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यातील मातला, करडी, पळसखेड भट, कव्हळा ता. चिखली, तांबोळा ता. लोणार आदींचा समावेश आहे.पैनगंगा नदीवरील पेनटाकळी प्रकल्पाचे सर्व नऊ वक्रद्वारे २५ से.मी उघडण्यात आले आहे. नदीपात्रात ७८९० क्युसेक (२२३.४४ क्यूमेक) इतका विसर्ग सोडण्यात येत आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येणार आहे. खडकपूर्णा नदीवरील खडकपूर्णा प्रकल्पाचे आठ वक्रद्वारे ३० से.मी ने व ११ वक्रद्वारे ६० से.मी. ने उघडण्यात आली आहेत. नदीपात्रात ३१ हजार ६५० क्यूसेक एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारामस व उतावळी प्रकल्पाच्या सांडव्यावरून नदीपात्रात पाणी येत आहे. करडी प्रकल्पाचे पाणी स्वयंचलीत दरवाजामधून नदीपात्रात येत आहे. त्यामुळे धाड ते माहोरा, धाड ते कुंबेफळ मार्गावर पाणी आले आहे. पर्यायाने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. बुलडाणा तालुक्यातील मातला प्रकल्प भरल्यामुळे नदी काठावरील मातला, रायपूर, सिंदखेड, सोनेवाडी व उंबरखेड गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पळसखेड भट प्रकल्प भरल्यामुळे पळसखेड भट, पिंपळगाव सराई, रायपूर व सोनेवाडी गावांना सतर्कतेचा इशारा शाखाधिकारी, सिंचन शाखा, बुलडाणा यांनी दिला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प