शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर तालुक्यातील पाच महसुली मंडळात ५९ मी.मी.पावसाची नोंद

By योगेश देऊळकार | Updated: September 22, 2023 18:56 IST

मलकापूर तालुक्यातील पाच महसुली मंडळात शुक्रवारी सकाळी सरासरी ५९ मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

मलकापूर : तालुक्यातील पाच महसुली मंडळात शुक्रवारी सकाळी सरासरी ५९ मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे कोरडवाहू पिकांना संजीवनी मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना व प्रचंड उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मलकापूर तालुक्यात दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात होती. जुलै महिन्यात १९ व २० सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर पावसाने जणुकाही दडीच मारल्याने पिकांच्या प्रामुख्याने कोरडवाहू पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली होती. 

तालुक्यात बागायती पिकांची परिस्थिती चांगली होती. पण कोरडवाहू पिकांना पावसाची नितांत गरज होती. त्यातल्या त्यात वातावरणात प्रचंड उकाडा वाढल्याने लोकांच्या अडचणी वाढल्या होत्या. असे असतानाच गुरुवारी रात्री व शुक्रवारी सकाळी अशा १२ तासात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिक सुखावले आहेत. शुक्रवारी सकाळी मलकापूर तालुक्यातील पाच महसुली मंडळात ५९ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे. त्यात मलकापूर महसुली मंडळात ७२.३ मी.मी., दाताळा ५३.८ मी.मी., नरवेल ४३.८ मी.मी. धरणगाव ७२.३ मी.मी. तर जांबुळधाबा महसुली मंडळात ५७ मी. मी. पावसाची नोंद झाली आहे.त्यामुळे मलकापूर तालुक्यातील पूर्व व उत्तर क्षेत्रातील पिकांना लाभ झाला आहे. नाल्याला पूर, चार बसफेऱ्या रद्दतालुक्यात गत १२ तास चांगला पाऊस झाला. त्यामुळे मलकापूर - देवधाबा रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या रस्त्यावर हिंगणा काझी येथील नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने या भागातील चार बसफेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती परिवहन महामंडळाचे आगारप्रमुख मुकूंद न्हावकर यांनी दिली आहे. या रस्त्यावरील शालेय बसफेऱ्या आधीच बंद होत्या. मात्र, प्रवासी बसफेऱ्या रद्द झाल्यानंतर अनेकांना त्याचा फटका बसला आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस