शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

हनवतखेड  येथील आदिवासी आश्रमशाळेमधील पाच कर्मचार्‍यांचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:26 IST

खामगाव (बुलडाणा):  शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापक छळ करीत असल्याचा आरोप करून  संग्रामपूर तालुक्यातील हनवतखेड  येथील आदिवासी आश्रमशाळेमधील पाच कर्मचार्‍यांनी शाळेच्या आवारातच विषारी द्रव्य प्राशन करून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना १९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली.

ठळक मुद्देकर्मचार्‍यांनी शाळेच्या आवारातच विषारी द्रव्य प्राशन करून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव (बुलडाणा):  शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापक छळ करीत असल्याचा आरोप करून  संग्रामपूर तालुक्यातील हनवतखेड  येथील आदिवासी आश्रमशाळेमधील पाच कर्मचार्‍यांनी शाळेच्या आवारातच विषारी द्रव्य प्राशन करून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना १९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली.  पाचही जणांना  उपचारार्थ  येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हनवतखेड हे आदिवासीबहुल गाव असून, तेथे महात्मा फुले आदिवासी व मागासवर्गीय सेवा संस्था जळगाव जामोद संचालित आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत पटावर तीनशे विद्यार्थी संख्या आहे. आश्रमशाळा व्यवस्थापनाने कर्मचार्‍यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी १९ डिसेंबर रोजी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत चर्चा सुरू असतानाच रवींद्र विठ्ठल मालोकार (स्वयंपाकी), संजय जगन्नाथ बोंबटकार, विजय गणपत राणे, भारत छगनराव कांबळे आणि सुनील अर्जुन उतपुरे हे पाच कर्मचारी बैठकीतून उठून बाहेर आले. पाचही जणांनी शाळेच्या आवारातच विषारी द्रव्य प्राशन केले. या कर्मचार्‍यांनी एका चिठ्ठीत मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन छळ करीत असल्याचा आरोप नमूद केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पाचही जणांना काही कर्मचार्‍यांनी तत्काळ स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर दुपारी दीड वाजता येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. सर्व जणांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मलकापूरचे  उपविभागीय पोलीस अधिकारी बोबडे यांनी आदिवासी आश्रमशाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. 

मागील आठवड्यात पाचही कर्मचारी व्यवस्थापनाची परवानगी न घेता बाहेरगावी निघून गेले होते. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने त्यांना वेतन कपातीची नोटीस बजावण्यात आली होती. तसेच मंगळवारी बैठकीसाठी मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले होते. या कर्मचार्‍यांशी विचारविनिमय सुरू असताना हे कर्मचारी बैठकीतून उठून बाहेर गेले.  हा सर्व प्रकार दबाव आणण्यासाठी करण्यात आला.- अँड. दिनेश सातव, अध्यक्षमहात्मा फुले आदिवासी व मागासवर्गीय सेवा संस्था, जळगाव जामोद

टॅग्स :khamgaonखामगावSchoolशाळा