खडकपूर्णा प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 05:19 PM2021-09-05T17:19:15+5:302021-09-05T17:20:26+5:30

The five doors of the Khadakpurna Dam opened : पाच गेट १० सेमीने उघडण्या आले असून त्यातून १ हजार ८८२० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

The five doors of the Khadakpurna project opened | खडकपूर्णा प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले

खडकपूर्णा प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले

googlenewsNext

बुलडाणा: खडपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे खडकपूर्णा प्रकल्पाती जलसाठा ९१.०२ टक्के झाले आहे. त्यामुळे प्रकल्पाचे पाच गेट १० सेमीने उघडण्या आले असून त्यातून १ हजार ८८२० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

१ सप्टेंबर रोजीही प्रकल्पाचे तीन गेट १० सेमीने उघडण्यात येऊन त्यातून १०९२ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. दरम्यान खडकपूर्णा नदीच्या उमग क्षेत्रात तथा मराठवाड्यातील काही भागात, गौताळा अभयारण्य परिसरात झालेल्या चांगल्या पावसामुळे खडकपुर्णा नदी दुधडी भरून वाहत होती. त्यामुळे गेल्या १५ दिवसापूर्वी मृतसाठ्यात असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाची पाणीपातळी ही झपाट्याने वाढली असून प्रकल्पामधील जलसाठा आजच्या घडीला ९१.०२ टक्के झाला आहे. त्यामुळे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. चार दिवसात प्रकल्पामध्ये दहा टक्क्याने जलसाठा वाढला आहे.

 नदी काठड्या ३३ गावांना सतर्कतेचा इशारा 
या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या ३३ गावांना सतर्कतेचा इशारा पूर्वीच देण्यात आला आहे. बुलडाणा, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील ही गावे आहेत. यात बुलडाणा जिल्ह्यातील निमगाव गुरू, सावंगी टेकाळे, डिग्रस बुद्रूक, डिग्रस खुर्द, टाकरखेड वायाळ, टाकरखेड भागिले, निमगाव वायाळ, साठेगाव, हिवरखेड, राहेरी खु., तडेगाव, राहेबी बुद्रूक, ताडशिवणी, देवखेड, पिंपळगाव कुडा, लिंगा, खापरखेडा, रायगाव, सावरगाव तेली या गावांचा समावेश आहे. दरम्यान जालना जिल्ह् ॉयातील किर्ला, दुधा, सासखेडा, लिंबखेडा, हनुमंत खेडा, उस्वद, टाकळखोपा, इंचा, कानडी, देवठाणा, वाघाळा सह परभणी जिल्ह्यातील वझर भामटे, सायखेड आमि हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील धानोरा या गावांचा समावेश आहे.

Web Title: The five doors of the Khadakpurna project opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.