सिद्धार्थ आराख /बुलडाणा : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या ह्यमहिला समृद्धी योजनेह्ण मध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची राज्य सरकारने सीबीआय चौकशी लावली असून, चौकशीचे धागेदोरे बुलडाण्या पर्यंत पोहचले आहेत. यासंबंधी गेल्या आठवड्यात एक पथक बुलडाणा येथे येऊन गेले. दरम्यान, या अपहार व गैरव्यवहार प्रकरणी राज्यातील ५ जिल्हा कार्यालये चौकशीच्या फेर्यात अडकले असून, लवकरच मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला तत्कालीन आघाडी सरकारने विविध योजनेवर कोट्यवधी रुपयाचा निधी मंजूर केला होता. यामध्ये महिला समृद्धी योजनेवेर प्रत्येक जिल्ह्याला ९ कोटी रुपये देण्यात आले होते. मातंग समाजातील महिलांनी छोटे-मोठे व्यवसाय उभे करून कुटुंबाचे आर्थिक जीवनमान उंचवावे हा हेतू या योजनेमागील होता. त्यानुसार प्रत्येक महिलेला ५0 हजार रु पयांचे अर्थसाहाय्य महामंडळाच्या वतीने देण्यात येत होते.; मात्र हे अर्थसाहाय्य वाटप करताना मोठय़ा प्रमाणावर अनियमितता झाली. प्रकरण अस्तित्वात नसताना धनादेश काढणे, एकाच घरात चार-चार व्यक्तीच्या नावे प्रकरणे तयार करणे, बँकेतून नियमबाह्य (सेल्फ चेकद्वारा) रकमा काढणे अशी अनेक प्रकरणे उघडकीस आल्यामुळे संबंधित लाभधारकांनी तक्रारी केल्या. दरम्यान, विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन आंदोलने, उपोषण केले. या तक्रारीची दखल घेऊन वरिष्ठ कार्यालयाने चौकशी करून धनादेश व इतर कार्यालयीन दस्तावेज जप्त करून घेतले आहेत.
पाच जिल्हे सीबीआय चौकशीच्या फे-यात
By admin | Updated: April 18, 2015 02:06 IST