शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हा अनलॉकच्या पहिल्या स्तरात, शिथिलतेची वेळ वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 11:21 IST

Buldana District Unlock : काही निर्बंध कायम ठेवून १४ जून पासून शिथिलतेच्या वेळेत वाढ करण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हाप्रशासनाकडून प्राप्त झाले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधापैकी काही निर्बंध कायम ठेवून १४ जून पासून शिथिलतेच्या वेळेत वाढ करण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हाप्रशासनाकडून प्राप्त झाले आहेत. ४ ते १० जून या सप्ताहामध्ये बुलडाणा जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.३७ टक्के असून एकूण बेडपैकी ९.०३ टक्के ऑक्सिजन बेडवर रुग्ण असल्याने  अनलॉकच्या पहिल्या स्तरात जिल्ह्याचा समावेश झाला आहे. त्यामुळे अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक वस्तुंची दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढविण्यात येणार आहे. ७ जून पासून जिल्ह्यात दररोज सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत अत्यावश्यक सेवांसह बिगर अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. त्यामुळे जवळपास दीड महिन्यापासून कोरोना प्रतिबंधासाठी लावण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आले. त्यावेळी जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरामध्ये समावेश होता. यात सुधारणा हाेउन जिल्हा पहिल्या स्तरामध्ये आला आहे. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेचा जिल्ह्याला मोठा फटका बसला. ही बाब पाहता जिल्हा अनलॉकच्या पहिल्या स्तरात असला तरी निर्बंध कायम ठेऊनच दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळेत वाढ करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सुत्रांनी स्पष्ट केले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील उद्योग, व्यवसायांना चालना मिळून जिल्ह्याचे अर्थचक्र गतीमान होण्यास मदत मिळणार असली तरी मर्यादीत निर्बंध कायम राहरणार आहेत. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकbuldhanaबुलडाणा