शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

बुलडाणा शहरात दोन कोटी रुपयांच्या फटाक्यांची विक्रीची होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 16:27 IST

दोन कोटी रुपयांच्या फटाक्यांची विक्री होण्याची शक्यता फटका विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर यंदा बुलडाणा शहरात ५४ पैकी ३० फटाका विक्रेत्यांचेच स्टॉल राहणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान यंदा जवळपास दोन कोटी रुपयांच्या फटाक्यांची विक्री होण्याची शक्यता फटका विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.प्रामुख्याने बुलडाणा शहरात घाऊक फटाका विक्रेते नाहीत. खामगाव येथे एक होता. मात्र नियमबाह्य फटाक्यांच्या साठ्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे बुलडाण्यातील फटका विक्रेत्यांच्या परवान्याचे नुतनीकरण करण्यात येवून जिल्हाधिकारी, पालिकेकडून त्यांना स्टॉल उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे.कोरोना संसर्गाच्या  पार्श्वभूमीवर सुरक्षीत शारीरिक अंतर ठेवण्यासोबतच मास्क घालूनच फटाका खरेदी करावी अशा सुचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. दरम्यान कोराना संसर्गाच्या भीतीमुळे काही विक्रेत्यांनी यंदा दुकाने न लावण्याचा निर्णय घेतला असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.कोरोना संसर्गाचा फटका बसण्याची शक्यताबुलडाणा शहरात दरवर्षी साधारणत: ५० फटाक्यांचे बुलडाणा अर्बन रेसीडेन्सीच्या समोरील मोकळ्या जागेत स्टॉल लागतात. यावर्षी कोराना संसर्गामुळे यापैकी फक्त ३० दुकानेच लागणार  आहेत. त्यामुळे दरवर्षी सुमारे अडीच कोटी रुपयांची उलाढाल होणाऱ्या शहरातील व्यवसायात यंदा तुलनेने कमी आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता आहे.

यंदा कमी प्रदुषण करणारे फटाके सर्वांनी आणले आहेत. विदेशी फटाके न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोराना  संसर्गामुळे यावर्षी ५४ परवाना धारकांपैकी २५ ते ३० जणच प्रत्यक्ष स्टॉल लावणार आहेत. गेल्या वर्षीच दिवाळीनंतर फटाक्यांची नोंदणी केल्या जाते.     - सतीषचंद्र रोठे अध्यक्ष फटाका असोसिएशन

टॅग्स :buldhanaबुलडाणाDiwaliदिवाळीCrackersफटाके