शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

सैलानीचे वनपर्यटन केंद्र आगीच्या भक्ष्यस्थानी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 16:25 IST

पिंपळगाव सराई :  सैलानी येथील वनपर्यटन केंद्राला गुरुवारी अचानक आग लागल्याने वनपर्यटन केंद्राच्या परिसरात लावलेली  हजारो झाडे होरपळली.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव सराई :  सैलानी येथील वनपर्यटन केंद्राला गुरुवारी अचानक आग लागल्याने वनपर्यटन केंद्राच्या परिसरात लावलेली  हजारो झाडे होरपळली. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने सैलानी यात्रेतील गर्दी ओसरल्यानंतर ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला.       सैलानी येथील डोंगरावर २५ एकर परिसरात वनविभागाचे वनपर्यटन केंद्र आहे. आमदार राहुल बोंद्रे यांनी दिलेल्या ४  कोटी रुपयांच्या निधीतून हे वनपर्यटन केंद्र बांधण्यात आले आहे. याठिकाणी मुलांकरिता खेळणी, विविध प्रकारचे देखावे, वन्यप्राण्यांच्या प्रतिकृती बनविल्या आहेत. केंद्राच्या परिसरात तलावाचे सौंदर्यीकरण केलेले आहे. विश्रामगृह, स्वच्छतागृह आदी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. अद्याप हे वनपर्यटन केंद्र जनतेसाठी खुले करण्यात आलेले नाही. केंद्राभोवती पुर्णपणे संरक्षण भिंत उभारलेली आहेत. परंतू काही ठिकाणी या संरक्षण भिंतीची पडझड झाली आहे. वनविभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.    वनपर्यटन  केंद्राच्या परिसरात हजारो झाडे लावलेली आहे. यापैकी बहुतेक झाडे ही दुर्मिळ वनौषधीची आहेत. झाडांना पाणी देण्यासाठी पळसखेड येथील धरणावरुन  पाईपलाईन केलेली आहे. दररोज पाणी दिल्या जात असल्याने झाडांची चांगली वाढ झालेली आहे. मात्र गुरुवारी वनपर्यटन केंद्राला अचानक आग लागली. यामध्ये दुर्मिळ प्रजातींची विविध झाडे जळ्याल्याने मोठे नुकसान झाले. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत माहिती मिळू शकली नाही. मोठा अनर्थ टळला सर्वधर्मिय एकात्मतेचे प्रतीक सैलानी यात्रा २० मार्चपासून सुरु झाली. यात्रेसाठी लाखो भाविकांची सैलानीत गर्दी झाली होती. भाविकांनी सैलानी परिसर व आजुबाजूच्या डोंगरावर झोपड्या उभारल्या होत्या.  २५ मार्च रोजीच्या संदलपर्यंत ही गर्दी तशीच कायम होती. यात्रेदरम्यान गुरुवारी वनपर्यटन केंद्राला आग लागली. सुदैवाने त्यावेळी यात्रेतील गर्दी कमी झालेली होती. आजूबाजूच्या झोपड्यांना आगीची झळ पोहोचली असती तर मोठा अनर्थ घडला असता.  सैलानी येथील वनपर्यटन केंद्राला आग लागून झाडे जळाल्याबाबत आपणास माहिती नाही. संबंधित वनरक्षकांकडून घटनेची माहिती घेऊन झाडांची पाहणी करण्यात येईल. - आर. टी. शिपेप्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) बुलडाणा 

टॅग्स :buldhanaबुलडाणाfireआग