मडाखेड (बुलडाणा) : येथील चांगेफळ रोडवर असलेल्या सुपोपरी हॉटेलला १५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे आग लागून सुमारे ८५ हजाराचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार चांगेफळ रोडवरील रघुनाथ जवंजाळ यांच्या शेतामध्ये संदीप जयस्वाल यांच्या सुपोपरी हॉटेलला बुधवारी रात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे हॉटेलला आग लागली. या आगीत फ्रिज, टेबल खुर्ची, फॅन, स्टोअ, भांडे जळून खाक झाले. या आगीत ४२ हजार रूपयाचे नुकसान झाले. तसेच हॉटेलला लागून रघुनाथ जवंजाळ यांचे शेती उपयोगी वस्तु ठेवलेल्या होत्या ते सुध्दा जळून खाक झाल्या. त्यामध्ये पाईप, स्प्रिंकलर सेट, ठिबक सट नग ३, दोर जळाले याचे ४३ हजार २00 रूपयाचे नुकसान झाले. या दोघांचे ८५ हजार २00 रूपयाचे नुकसान झाले. घटनेच्या दुसर्या दिवशी गुरूवारी तलाठी एस.एस. काळे, कोतवाल शिवहरी सित्रे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
हॉटेलला आग : ८५ हजारांचे नुकसान
By admin | Updated: October 18, 2014 00:40 IST