शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात वणवा पेटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 01:06 IST

बुलडाणा: जिल्ह्याचे वैभव असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात शुक्रवारी दुपारी पेटलेल्या वणव्यामुळे अभयारण्यातील हजारो हेक्टरवरील वनसंपदा नष्ट झाली आहे. या वणव्यामुळे अभयारण्यातील जैवविविधतेलाही मोठा फटका बसला आहे.

ठळक मुद्देतीन बिटमध्ये विस्तारली आगहजारो हेक्टरवरील वनसंपदा नष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्याचे वैभव असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात शुक्रवारी दुपारी पेटलेल्या वणव्यामुळे अभयारण्यातील हजारो हेक्टरवरील वनसंपदा नष्ट झाली आहे. या वणव्यामुळे अभयारण्यातील जैवविविधतेलाही मोठा फटका बसला आहे.शुक्रवारी खामगाव रेंजमधील पलढग बिटमध्ये हा वणवा पेटला. तो विझविण्यासाठी प्रयत्न झाले; पण तो आटोक्यात आला नाही. उलट तो आणखी वाढतच गेला. रात्रभर ज्ञानगंगा अभयारण्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. पहाटेच्या वाºयामुळे वणवा अधिकच भडकला असून, सध्या पलढग, उत्तर देव्हारी व बोरखेड या तीन बिटमधील वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. ही आग आटोक्यात आणणे अवघड होऊन बसले आहे.ज्ञानगंगा अभयारण्य हे २०४ चौरस किमी विस्तारलेले असून, बुलडाणा, चिखली, मोताळा आणि खामगाव तालुक्याच्या सीमावर्ती भागात व्यापलेले आहे. प्रामुख्याने बिबट व मोठ्या संख्येने असलेल्या अस्वलांसाठी ज्ञानगंगा अभयारण्य प्रसिद्ध आहे. सध्या या वणव्याने बुलडाणा, खामगाव  व मोताळा या तीन तालुक्यांच्या सीमावर्ती भागातील पलढग, बोरखेड व उत्तर देव्हारी या तीन बिटमध्ये रौद्र रूप धारण केले आहे. अलीकडे ज्ञानगंगा अभयारण्यात लागलेली ही १५ वी आग आहे.आग आटोक्यात  आणण्याच्या अपुºया साधनांमुळे ज्ञानगंगा अभयारण्याचे सातत्याने नुकसान होत असून, जंगलाची घनताही कमी झाली आहे. सातत्याने होत असलेली ही हानी रोखण्याकरिता नेमक्या उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. वन्यजीव विभागाकडे काही प्रमाणात अग्निरोधक साधने उपलब्ध असली तरी, त्यांचा परिणामकारक उपयोग केला जात नसल्याची माहीती आहे. दरवर्षी ज्ञानगंगा अभयारण्याला आगी लागण्याच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. 

पलढग बिटची मोठी हानी!पलढग बिटमध्ये प्रथमत: आग लागली होती. ती भडकत गेली व अन्य भागात पसरली. त्यामुळे पलढग बिटमधील वनसंपदेचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अग्निरक्षक व वन विभागाचे कर्मचारी ही आग विझविण्यासाठी प्रयत्नरत असले तरी मनुष्यबळाचा येथे मोठा अभाव असल्याचे चित्र आहे. या आगीत पलढग बिट जवळपास ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात नुकसानग्रस्त झाल्याचे बोलल्या जात आहे; मात्र त्यास अधिकृत स्तरावर दुजोरा मिळू शकला नाही. याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी वन्यजीवचे बुलडाणा रेंजचे आरएफओ मयूर सुरवशे व खामगाव रेंजचे आरएफओ यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकले नाही. अकोला येथील वन्यजीवचे डीएफओ मनोजकुमार खैरनार यांच्याशीही संपर्क साधला असता, त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाdnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्य