शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात रात्री 10 वाजेनंतर फटाक्यांची आतषबाजी सुरूच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 00:44 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत फटाके फोडण्यात आल्याचा प्रकार बुधवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडला.

खामगाव  - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत फटाके फोडण्यात आल्याचा प्रकार बुधवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडला. राज्य सरकारने केलेल्या फटाके मुक्त दिवाळी च्या अहवालाकडे नागरिकांनी डोळेझाक केल्याचे आढळून आले. धनत्रयोदशीच्या दिवशी ट्रॉम्बे येथील सोसायटीमध्ये दोन युवकांनी फटाके फोडल्याच्या कारणावरून पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याची कारवाई केली होती. त्यानंतर तरी नागरिकांमध्ये जागृती होऊन फटाके फोडण्यावर काही प्रमाणात बंदी येईल असे वाटले होते. मात्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके फोडण्यावर कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध दिसून आला नाही.बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा, खामगाव, शेगाव, मलकापूर, संग्रामपूर, जळगाव तालुक्यामध्ये रात्री दहा ते बारा वाजेदरम्यान फटाक्यांची आतषबाजी सुरूच असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे बुलढाणा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पथके सुद्धा नेमली होती.  रात्री 10 वाजेनंतर फटाके फोडण्यावर प्रतिबंध आणण्यासाठी हे पथक कार्यान्वित केले होते. मात्र दिवाळीच्या दिवशी काही तालुक्यात एकही पथकाने काही ठिकाणी कारवाई केली नसल्याचे दिसून आले. यावरून राज्य शासनाच्या आदेशाचा पोलीस प्रशासनाला विसर पडला तर नागरिकांनी कुठलाही प्रतिसाद दिला नसल्याचे आढळून आले.

टॅग्स :fire crackerफटाके