शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा तालुक्यातील भडगाव शिवारात आग; लाखोंची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:32 IST

रुईखेड मायंबा: बुलडाणा तालुक्यातील मौजे भडगाव (मायंबा) शिवारात ४ मे रोजी गट नं. २७२ आणि २७३ मध्ये अनुक्रमे द्वारकाबाई पाटीलबा जंजाळ आणि गणेश फकिरबा जंजाळ यांच्या मालकीच्या गोठ्यास, राहत्या घरास विद्युत तारेच्या घर्षणामुळे आग लागून अंदाजे सात लक्ष रुपयाचे नुकसान झाले.

ठळक मुद्देएक बैल दगावलासंसारोपयोगी साहित्य नष्ट

लोकमत न्यूज नेटवर्करुईखेड मायंबा: बुलडाणा तालुक्यातील मौजे भडगाव (मायंबा) शिवारात ४ मे रोजी गट नं. २७२ आणि २७३ मध्ये अनुक्रमे द्वारकाबाई पाटीलबा जंजाळ आणि गणेश फकिरबा जंजाळ यांच्या मालकीच्या गोठ्यास, राहत्या घरास विद्युत तारेच्या घर्षणामुळे आग लागून अंदाजे सात लक्ष रुपयाचे नुकसान झाले.चार मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास द्वारकाबाई जंजाळ आणि गणेश जंजाळ यांच्या गोठ्यास आग लागली, त्यात द्वारकाबाई जंजाळ यांचा एक बैल ठार तर एक बैल, एक गाय आणि दोन वासरे गंभीर जखमी झाले. त्यासोबतच शेती उपयोगी साहित्य, धान्य असा एकूण ३ लाख ३० हजार रुपयांचे तसेच गणेश जंजाळ यांचे संसार उपयोगी साहित्य, जमीन विक्रीतून आलेले ३ लाख, टीन पत्रे असे एकूण ३ लाख ४८ हजार अशी एकूण ७ लाख रुपयाची हानी दोन्ही आगीमध्ये झाली.पंचनामा भडगाव (मायंबा) येथील तलाठी संजय जगताप यांनी करून शासनास तशी माहिती दिली. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष मदन साखरे, राहुल साखरे, श्रीधर साखरे आदींची उपस्थिती होती. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून, शासन स्तरावर मदतीची गरज आहे.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रामुख्याने गुरांच्या गोठ्यांना आगी लागण्याच्या घटना अधिक आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या पशुधनाची हानी होत आहे. याबाबत आगीपासून गोठ्यांचे तथा शेती साहित्याचे कसे संरक्षण करावे, याबाबत शेतकºयांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.                      

दोन्हीही शेतक-यांची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. शासन स्तरावर मदतीसाठी राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नक्कीच लक्ष देतील.- मदन साखरेमहात्मा गांधी तंटामुक्त समितीभडगाव (मायंबा)

टॅग्स :buldhanaबुलडाणाfireआग