सिंदखेडराजा येथे आडत दुकानाला आग, ४१ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 11:32 AM2021-02-10T11:32:06+5:302021-02-10T11:32:17+5:30

Fire at Sindkhedraja सोयाबीन, तुर, मूग, मका, ज्वारी, हरबरा असा एकूण ४१ लाखांचा माल जळून खाक झाला. 

Fire at Adat shop at Sindkhedraja, loss of Rs 41 lakh | सिंदखेडराजा येथे आडत दुकानाला आग, ४१ लाखांचे नुकसान

सिंदखेडराजा येथे आडत दुकानाला आग, ४१ लाखांचे नुकसान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेड राजा :  कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भगवान बाबा ट्रेडर्स या आडत दुकानाला ९ फेब्रुवारी सकाळी आग लागली.  या आगीत सोयाबीन, तुर, मूग, मका, ज्वारी, हरबरा असा एकूण ४१ लाखांचा माल जळून खाक झाला. 
 स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भगवान बाबा ट्रेडर्स या आडत दुकानाला ९ फेब्रुवारी सकाळी आग लागल्याचे आडत दुकानदार अशोक श्रीराम वाघ यांना कळले. त्यानुसार, त्यांनी पाण्याचे टँकर बोलवत आग आटोक्यात आणली.  घटनेची सविस्तर लेखी तक्रार पोलीस स्टेशन सिंदखेड राजा यांना देण्यात आली आहे.  या तक्रारीत नमूद आहे की, सदर आगीत भगवान बाबा ट्रेडर्समध्ये खरेदी केलेले २७३ क्विंटल सोयाबीन, ६४ क्विंटल तूर, ३६७ क्विंटल मूग, ९४ क्विंटल मका,  १०३ क्विंटल ज्वारी, ६ क्विंटल हरबरा आदी जळून खाक झाले. ही आग शाॅर्ट सर्किटमुळे लागल्याचे समाेर येत आहे. 

Web Title: Fire at Adat shop at Sindkhedraja, loss of Rs 41 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.