अखेर ‘त्या’ बहुचर्चित नालीचे बांधकाम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:15 AM2021-09-02T05:15:02+5:302021-09-02T05:15:02+5:30
भुतेकर यांच्या घरापासून ते नालेपावेतो नालीचे बांधकाम प्रभागाच्या नगरसेविका रेखाताई दीपक बोरकर यांनी दोन वर्षापूर्वी प्रस्तावित केले होते. ८ ...
भुतेकर यांच्या घरापासून ते नालेपावेतो नालीचे बांधकाम प्रभागाच्या नगरसेविका रेखाताई दीपक बोरकर यांनी दोन वर्षापूर्वी प्रस्तावित केले होते. ८ ऑगस्ट रोजी नगरपालिकेच्या सर्वसाधरण सभेमध्ये मंजुरात होऊन १३ ऑक्टोबर २०२० सृष्टी कन्स्ट्रक्शनला कार्यारंभ आदेशसुद्धा मिळाला होता. परंतु काही नागरिकांच्या घरासमोरून नाली जात असल्यामुळे सांडपाण्याचा व दुर्गंधीचा त्रास होईल म्हणून त्यांनी प्रचंड विरोध केला. वारंवार काम बंद पाडले. परिणामी संपूर्ण दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर तसेच श्रीकृष्ण मंदिर परिसरात येऊन नागरिकांच्या रहदारीचा आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. भागातील नागरिकांनी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दीपक बोरकर व नगरपालिका मुख्याधिकारी निवेदिता घारगे यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. मुख्याधिकारी घारगे यांनी स्थळ निरीक्षण करून दोन दिवसांत प्रश्न मार्गी लावते म्हणून आश्वासित केले. यानंतर बोरकर यांनी राष्ट्रवादी नेते एल. एम. शिंगणे, माई हॉस्पिटलचे संचालक डॉ. आशुतोष सोलंकी, प्रसिद्ध सोनेचांदी व्यापारी पप्पूसेठ धन्नावत यांची भेट घेऊन जनतेच्या प्रश्नासाठी सहकार्य करण्याची विनंती केली.