Finally, the Bhusaval-Narkhed passenger started | अखेर भुसावळ-नरखेड पॅसेंजर सुरू
अखेर भुसावळ-नरखेड पॅसेंजर सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : अनेक दिवसांपासून पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल होत होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मोहन पाटील यांनी उपोषण सुरू केले होते. यानंतर १० जून रोजी भुसावळ-नरखेड पॅसेंजर सुरू करण्यात आली.
मोहन पाटील यांनी २ जूनपासून नांदुरा रेल्वे स्टेशन समोर उपोषण सुरू केले. अखेर रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते नरखेड पॅसेंजर सुरू केली. भुसावळ ते नागपूर व भुसावळ ते वर्धा ह्या गाड्याही लवकरच सुरू करण्यात येतील, असे आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले. मोहन पाटील यांच्या उपोषणाला परिसरातील नागरीकांनी पाठींबा दिला. दरम्यान भुसावळ-नरखेड पॅसेंजर नांदुरा रेल्वे स्थानकावर आली असता मोहन पाटील यांनी झेंडी दाखवून गाडीला पुढे रवाना केले. यावेळी युवराज देशमुख, डॉ.अमीन, रफीकसेठ, नितीन मानकर, राजेश गावंडे, डॉ.प्रदीप हेलगे, बशीरखॉ, संजय चोपडे, पुरूषोत्तम साबे, रमेश पायघन, योगेश चावरे, शरद चोपडे, कलीम परवेज, शंकर सकळकर, किसना पाटील, महादेव पुरी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


Web Title: Finally, the Bhusaval-Narkhed passenger started
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.