शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्रामध्ये फ्यूज लावण्यावरून हाणामारी; तीन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 12:11 IST

Crime News घटना संग्रामपूर तालुक्यातील वानखेड शिवारातील शेतात मंगळवारी सकाळी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : शेतातील रोहित्रामध्ये फ्यूज टाकण्यावरून उद्भवलेला वादाचे रूपांतर शाब्दिक चकमकीनंतर हाणामारीत झाले. परस्परांनी  धारदार शस्त्राने एकमेकांवर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना संग्रामपूर तालुक्यातील वानखेड शिवारातील शेतात मंगळवारी सकाळी घडली. त्यामध्ये ३ जण गंभीर जखमी झाले.शोभा ज्ञानदेव हागे यांच्या वानखेड शिवारातील शेतातील रोहित्रामध्ये फ्यूज टाकण्यासाठी चौघेजण आले होते. शेतमालकांनी या चौघांना शेतात रोहित्रात काम करण्यास मनाई केली. फ्यूज टाकण्यास शेतात येऊ न दिल्याने चौघांनी शिवीगाळ केली. त्यामुळे वाद पेटला. शिवीगाळीचे रूपांतर हाणामारीत झाले. चौघांनी शेतमालकाच्या मुलांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. यातील एकाने शोभा हागे यांचा मुलगा शिवहरी हागे याच्या मंनगटावर कोयत्याने वार करून जखमी केले. तर दुसऱ्याने दुसरा मुलगा संदीप हागे यांच्या डाव्या बरगडीवर कुर्‍हाडीने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी शोभा हागे यांनी तामगाव पोलीसात तक्रार दिली. त्यावरून  अंबादास तुळशीराम पचांगे, करण अंबादास पचांगे, अजय अंबादास पचांगे, अनिकेत पचांगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सपना पचांगे यांच्या तक्रारीनुसार हागे यांच्या शेतातील रोहित्रात फ्यूज टाकण्यासाठी गेले असता दोघांनी शिवीगाळ केली. त्यांना समजावण्यासाठी पती व मुलगा घटनास्थळावर गेले. मात्र या दोघांनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीचा हात पिरगळला. मुलगा करन पचांगे याच्या मनगटासह पाठीवर कत्तीने वार करून गंभीर जखमी केले. या फिर्यादीवरून शिवहरी ज्ञानदेव हागे, संदीप हागे या दोन्ही आरोपींवर कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यातील गंभीर जखमींना वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पुढील उपचारासाठी शेगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले.  पोलिस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरCrime Newsगुन्हेगारी