शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात ‘डिजिटल इंडीया’चा बोजवारा;  इंटरनेट सेवा वारंवार खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 15:37 IST

संग्रामपूर: तालुक्यातील ग्रामीण भागात इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने कॅशलेस व्यवहारांवर याचा परिणाम होत आहे. परिणामी डिजिटल इंडीयाचा संग्रामपूर तालुक्यात बोजवारा उडाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: तालुक्यातील ग्रामीण भागात इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने कॅशलेस व्यवहारांवर याचा परिणाम होत आहे. परिणामी डिजिटल इंडीयाचा संग्रामपूर तालुक्यात बोजवारा उडाला आहे.संग्रामपूर तालुक्यात आठवड्यातून तीन ते चार दिवस इंटरनेट सेवा ठप्प होते. परीणामी आॅनलाईन कामकाजावर परिणाम होत आहे. बँकांचे व्यवहार बंद पडत आहेत. असे वारंवार होत असल्याने कॅशलेस व्यवहारांचा फुगाही फुटला आहे. संग्रामपूरसह वरवट बकाल, पातुर्डा, बावनबिर, सोनाळा येथे राष्ट्रीयकृत बँकांसह पतसंस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालय तसेच आॅनलाईन कामकाजाकरीता महा ई सेवा केंद्र, सी. एस. सी. सेंटर कार्यान्वित आहेत. ह्या सर्व सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी इंटरनेट सेवा आणि तीही जलद गतीने सुरू राहण्याची गरज आहे; परंतु संग्रामपूर तालुक्यात असे होताना दिसत नाही. जलदगतीने इंटरनेट सेवा तर सोडाच, बीएसएनएल ब्रॉडब्रँडची सेवाही वारंवार विस्कळीत होते. सध्या गत दोन दिवसांपासून कनेक्टिव्हिटी नसल्याने सर्वच आॅनलाईन व्यवहार बंद पडल्यागत झाले आहेत. शेतकऱ्यांना शेतीची कामे सोडून बँकेत इंटरनेट सेवा सुरळीत होण्याची वाट पाहत उभे राहावे लागत आहे. सोनाळा येथील भारतीलय स्टेट बँकेत ग्राहक इंटरनेट सेवा सुरू होण्याची वाट पाहत आहेत. तासन्तास उभे राहूनदेखिल व्यवहार होत नसल्याचे चित्र आहे. अखेर संध्याकाळी काम न होताच परतावे लागत आहे. पुन्हा दुसºया दिवशीही तीच परिस्थिती ग्राहकांवर येत आहे. शासनाने मोठा गाजावाजा करीत आॅनलाईन कामकाजांवर भर दिला. परंतु इंटरनेट सेवाच विस्कळीत राहत असल्याने शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासण्यात येत असल्याचे चित्र आहे.दर आठवड्यात केबल तुटल्याचे कारण पुढे करीत बीएसएनएलची इंटरनेट विस्कळीत राहत आहे. तालुक्यातील बावनबीर येथील बँक आॅफ महाराष्ट्र व सोनाळा येथील भारतीय स्टेट बँक शाखेत गत दोन दिवसांपासून कनेक्टिव्हीटी नाही. परिणामी येथील व्यवहार पुर्णपणे ठप्प झाले आहेत.वारंवार खंडीत होत असलेल्या ब्रॉडबँड सेवेबाबत जळगाव जामोद येथील बीएसएनएल कार्यालयाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात. केबल तुटल्याचे कारण पुढे करीत इंटरनेट सेवा खंडीत करण्यात येत आहे, असा आरोप ग्राहकांकडून करण्यात येत आहे.

इंटरनेट सेवा बंद असल्याने बँकांचे व्यवहार वेळेवर होत नाहीत. इतर महत्त्वाची कामे सोडून दिवसभर बँकेत लाईनमध्ये उभे राहावे लागत आहे. आठवड्यातून किमान तीन तेच चार दिवस अशीच परिस्थिती असते. याविरोधात आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही.- पांडुरंग वेरूळकारशेतकरी, सोनाळा ता. संग्रामपूरफायबर आॅप्टिक केबल तुटल्यामुळे ब्रॉडबँड सेवा विस्कळीत झाली आहे. जोडणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच इंटरनेट सेवा सुरळीत होईल.- राकेश मेहराकनिष्ठ अभियंता,बी.एस.एन.एल. कार्यालय, जळगाव जामोद.

टॅग्स :khamgaonखामगावSangrampurसंग्रामपूरdigitalडिजिटलInternetइंटरनेट