शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीच्या भिंतीवर उमटणार मतदार राजाची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 17:23 IST

बुलडाणा: लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी व मतदानाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी दीड हजार लोकशाहीच्या भिंती उभारण्यात येत आहेत.

बुलडाणा: लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी व मतदानाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी दीड हजार लोकशाहीच्या भिंती उभारण्यात येत आहेत. निवडणूक विभागाच्या या उपक्रमामुळे मतदार राजांना त्यांची भावना हस्तलिखीत स्वरूपात लोकशाहीच्या भिंतीवर मांडता येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून विविध महत्त्वकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यात मतदार जनजागृतीसाठी वेगवेळे प्रयोग राबविण्यात येत आहेत. मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदानाचे प्रमाण वाढावे, मतदान प्रक्रियेविषयी मतदार राजांना त्यांचे मत मांडता यावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून ‘लोकशाहीची भिंत’ नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सुमारे दीड हजार सार्वजनिक ठिकाणी लोकशाहीची भिंत उभारण्यात येत आहे. नवीन मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण व्हावी, नव मतदारांच्या विचारांना वाव मिळावा, त्यांच्या मनातील संदेश निवडणूक आयोगापर्यंत पोहचावा, यासाठी शाळा, महाविद्यालय परिसरातही लोकशाहीची भिंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेत लोकशाहीच्या भिंतीचे उद्घाटन विभागीय आयुक्तांनी त्यावर संदेश लिहून मागील आठवड्यामध्ये केले. तेंव्हा पासून जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी लोकशाही भिंत उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पुढील आठवड्यामध्ये जवळपास सर्वच ठिकाणी लोकशाही भिंत हा उपक्रम पोहचणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

याठिकाणी लागणार लोकशाहीची भिंतजिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद जिल्ह्यातील सर्व नगर पालिका, पंचायत समिती, तहसिल कार्यालय, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालय व इतर अनेक सार्वजनिक ठिकाणी लोकशाही भिंत उभारण्यात येणार आहे. 

 नवनवीन ‘स्लोगन’ येणार समोरलोकशाही भिंतीवर प्रत्येकाला मतदानाविषयी आपला संदेश किंवा मतदार जागृतीचे स्लोगन लिहिण्याचा अधिकार आहे. त्यामुळे लोकशाही भिंत या उपक्रमातून ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’!, ‘मतदानाचा अधिकार, लोकशाहीचा आधार’ यासारखे व इतर नवनविन ‘स्लोगन’ समोर येतील.

टॅग्स :buldhanaबुलडाणाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक