शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस लांबल्यामुळे शेतकरी चिंतातूर; पावसाची प्रतिक्षा कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 18:40 IST

खामगाव :  मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच आगमन करून सर्वांनाच सु:खद धक्का देणाºया पावसाने गेल्या आठ दिवसांपासून चांगलीच दांडी मारली.  यावर्षी वर्तविण्यात आलेल्या अंदाजांना काहिशी बगल देत पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

ठळक मुद्दे मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने शेतकºयांच्याही आशा पल्लवीत झाल्या होत्या. शेतकरी पेरणीच्या तयारीत असतानाच अचानक पावसाने दडी मारली. आभाळाकडे नजरा लावून बसण्यापलिकडे शेतकºयांच्या हाती सध्यातरी काही उरले नाही.

- देवेंद्र ठाकरे खामगाव :  मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच आगमन करून सर्वांनाच सु:खद धक्का देणाºया पावसाने गेल्या आठ दिवसांपासून चांगलीच दांडी मारली.  यावर्षी वर्तविण्यात आलेल्या अंदाजांना काहिशी बगल देत पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. एकीकडे मशीगतीची सर्व कामे पुर्ण झाली असली, तरी पेरणीयोग्य पावसाची अद्याप प्रतिक्षा कायमच आहे.२५ मे रोजी रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर महाराष्ट्रात पावसाला सुरूवात झाली. अनेकठिकाणी मुसळधार  स्वरूपाचा पाऊस पडला. मृग नक्षत्राची सुरूवात होईपर्यंत बुलडाणा जिल्ह्यातही पावसाचे आगमन झाले. यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यासह अनेकांनी वर्तविला असल्याने व मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने शेतकºयांच्याही आशा पल्लवीत झाल्या होत्या. अनेक वर्षांनतर यावर्षी मृग नक्षत्रातच पेरणी होण्याची दाट शक्यता यामुळे निर्माण झाली होती.  शेतकºयांनीही मशागतीची कामे वेगाने केली. उसनवारी किंवा जसे जमेल तसे खते, बियाण्यांचे नियोजनही केले. शेतकरी पेरणीच्या तयारीत असतांनाच अचानक पावसाने दडी मारली. यानंतर आज येईल, उद्या येईल असे करता-करता तब्बल आठ ते दहा दिवस उलटले. तुर्तास  आभाळाकडे नजरा लावून बसण्यापलिकडे शेतकºयांच्या हाती सध्यातरी काही उरले नाही.

 बियाणे, खतांच्या खरेदीतून फटकामृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या. यावर्षी लवकर पेरणी करायची या आशेने अनेक शेतकºयांनी बियाणे, खताची खरेदी केली. सगळीकडे पावसाचे वातावरण असल्याने बियाणे विक्रीच्या दुकानांवर शेतकºयांनी गर्दी केली. खरेदीत आलेली तेजी पाहता विक्रेत्यांनीही थोड्या फार फरकाने जादा दर आकारत पैसा वसूल करण्याचा प्रयत्न केला. पावसाचे वातावरण पाहून शेतकºयांनाही घासघिस न करता, बियाणे व खत खरेदी केली. यातून कमी-अधिक प्रमाणात अनेक शेतकºयांना जादा पैसे मोजावे लागले.

 पुर्णेच्या पुरानेही बळावल्या होत्या आशामध्यंतरी पुर्णा नदीला पूर आला होता. आपल्याकडे पाऊस पडला नसतांनाही मध्यरात्री आलेल्या या पूराबद्दल पहाटे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. पुर्णेला आलेला पूर हा अकोला जिल्हा तसेच इतर ठिकाणी पडलेल्या पावसामुळे आला, हे नंतर सगळ्यांना कळले. परंतु अकोला जिल्ह्यात चांगला  पाऊस झाला याचा अर्थ आपल्याकडेही एकदोन दिवसात दमदार पाऊस होईल अशी आशा साºयांनाच लागली होती. अर्थात या आशेवरही तुर्तास पाणि फेरल्या गेले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावmonsoon 2018मान्सून 2018Farmerशेतकरी