शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

कर्ज वाटपाच्या कासवगतीने शेतकरी चिंतेत; उसनवारी फेडण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 14:31 IST

जानेफळ : कासव गतीने सुरू असलेल्या पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेमुळे जानेफळ परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पेरणी होऊन महिना उलटला तरी शेतकऱ्यांना कर्ज मिळालेले नाही. त्यामुळे पेरणीसाठी उधारीने घेतलेल्या साहित्याचे पैसे देण्यास उशीर होत आहे. बाजारात पत खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. सात जूनला सुरू झालेल्या मृग नक्षत्रानंतर आठ ...

ठळक मुद्देपिके अांतर मशागतीवर आलेले असतानासुद्धा पीक कर्जाचे वाटप मात्र कासवाच्या गतीने होत आहे. परिसरातील ५० खेड्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या जानेफळ येथे राष्ट्रीयकृत बँकेची एकमेव भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे.

जानेफळ : कासव गतीने सुरू असलेल्या पीक कर्ज वाटपाच्या प्रक्रियेमुळे जानेफळ परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पेरणी होऊन महिना उलटला तरी शेतकऱ्यांना कर्ज मिळालेले नाही. त्यामुळे पेरणीसाठी उधारीने घेतलेल्या साहित्याचे पैसे देण्यास उशीर होत आहे. बाजारात पत खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. सात जूनला सुरू झालेल्या मृग नक्षत्रानंतर आठ ते १० दिवसानंतरच पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये पेरणीची घाई सुरू झाली होती. सधन शेतकरी पेरणी करताना पाहून इतर शेतकऱ्यांनीही पीक कर्जाच्या भरवशावर व्यापाऱ्यांकडून उधारीने बी-बियाणे, रासायनिक खते तसेच ट्रॅक्टर मालकांची सुद्धा मनधरणी करीत उधारीने ट्रॅक्टरद्वारे पेरणी करून घेतली. पिके अांतर मशागतीवर आलेले असतानासुद्धा पीक कर्जाचे वाटप मात्र कासवाच्या गतीने होत आहे. कृषी केंद्र चालक तसेच ट्रॅक्टर मालक पैशासाठी शेतकऱ्यांच्या दारात दररोज चकरा मारत आहेत. मात्र त्यांना देण्यासाठी पैसा नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. परिसरातील ५० खेड्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या जानेफळ येथे राष्ट्रीयकृत बँकेची एकमेव भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. संपूर्ण खेड्यांचा व गावाचा भार याच शाखेवर आहे. शाखेत अपुरे कर्मचारी असल्याने कामकाज फारच संथ गतीने चालते. कधी लिंक फेल, कधी नेट प्रॉब्लेम तर कधी कर्मचारी रजेवर जात असल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

केवळ १३८ शेतकऱ्यांना कर्जवाटप

स्टेट बँक शाखेअंतर्गत असलेल्या एकूण ९ हजार खातेदार शेतकऱ्यांपैकी फक्त २७०० शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरलेले आहेत. त्यापैकी केवळ ४०० शेतकºयांना नवीन कर्ज वाटप होणार आहे. मात्र अद्याप केवळ १३८ शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले आहे. कर्जाच्या प्रतीक्षेत शेतकºयांना दररोज बँकेत चकरा माराव्या लागत आहेत.

राजकीय पक्षांची भूमिका गोलमाल

सध्या शेतकºयांना पिकांची डवरणी, निंदण व तणनाशकांच्या फवारणीसाठी पैशाची गरज आहे. पैशाअभावी शेतीचे कामे खोळंबली आहेत. मात्र कर्ज मिळत नसल्याने बँकेच्या कर्जाची वाट पाहण्याऐवजी शेतकरी सावकारांचे दार ठोठावत आहेत. शिवसेनेचे पदाधिकारी सेना स्टाईलने आंदोलन छेडण्याच्या पोकळ धमक्या देतात. तर काँग्रेसचे पुढारी केवळ बँक मॅनेजरला निवेदन देत आहेत

टॅग्स :buldhanaबुलडाणाbankबँकFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज