शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाच्या तोंडावर शेतकर्‍यांचे खिसे रितेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:07 IST

जानेफळ : एकीकडे सूर्य आग ओकत असताना शेतकर्‍यांची मात्र तोंडावर आलेल्या खरीप हंगामासाठी लगबग सुरू झाली आहे. लग्न सराईचा धूमधडाका सध्या मुहूर्त नसल्यामुळे थांबलेला असल्याने शेतकरी शेतीच्या कामाकडे वळले आहेत. परंतु खिसे रिकामेच असल्याने कर्जासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू झाली आहे. मागील वर्षीची कर्जमाफी अद्यापपर्यंत अनेक शेतकर्‍यांना मिळालेली नाही. शेतकर्‍यांना तत्काळ कर्ज द्यावे, असे शासनाचे निर्देश असले, तरी बँकांना मात्र अद्यापपर्यंत आदेश मिळाले नसल्याचे बँक व्यवस्थापकाकडून सांगण्यात येत आहे. 

ठळक मुद्देकर्ज वाटपाचा अद्याप आदेश नाही पैसा नसल्याने बळीराजा अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कजानेफळ : एकीकडे सूर्य आग ओकत असताना शेतकर्‍यांची मात्र तोंडावर आलेल्या खरीप हंगामासाठी लगबग सुरू झाली आहे. लग्न सराईचा धूमधडाका सध्या मुहूर्त नसल्यामुळे थांबलेला असल्याने शेतकरी शेतीच्या कामाकडे वळले आहेत. परंतु खिसे रिकामेच असल्याने कर्जासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू झाली आहे. मागील वर्षीची कर्जमाफी अद्यापपर्यंत अनेक शेतकर्‍यांना मिळालेली नाही. शेतकर्‍यांना तत्काळ कर्ज द्यावे, असे शासनाचे निर्देश असले, तरी बँकांना मात्र अद्यापपर्यंत आदेश मिळाले नसल्याचे बँक व्यवस्थापकाकडून सांगण्यात येत आहे.  शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये पैसे नसल्याने त्यांची झोप उडाली आहे. गेल्या वर्षीचा हंगाम शेतकर्‍यांसाठी दुष्काळाचाच ठरला. मोठय़ा उत्साहाने पैशांची जुळवाजुळव करून शेतकरी तयार झाला. परंतु वरुणराजाने शेतकर्‍यांचे कंबरडेच मोडले होते. अत्यल्प पावसाने पिके सुकली, काही प्रमाणात झालेल्या पिकांवर बोंडअळी, किडींच्या प्रमाणामुळे उत्पादनात घट झाली आणि कसेबसे घरात आलेल्या शेतमालाला सुद्धा बाजार भाव न मिळाल्यामुळे कंबरडेच मोडले.कर्जमाफीची घोषणा हवेतच जिरल्यामुळे आता पुन्हा शेतकरी कर्जाच्या खाईत सापडला आहे. खरीप हंगाम जवळ आल्याने बी-बियाणे व रासायनिक खतांसाठी आता पैसा कोठून आणाव,ा अशा विचारात पडला आहे. मात्र, शासनाने जणु काही शेतकर्‍यांसोबत पोरखेळच चालविला आहे. एकीकडे शेतकर्‍यांना तत्काळ कर्ज देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे प्रसिद्धी माध्यमांसमोर सांगितल्या जात आहे, तर दुसरीकडे बँक प्रशासन आम्हाला पीक कर्ज वाटपाविषयी अद्याप कुठलेच आदेश मिळाले नसल्याचे सांगतात. त्यामुळे शेतकर्‍यांना चकरा माराव्या लागत आहेत.यावर्षीच्या खरीप हंगामाची सुरुवात दरवाढीने होत आहे. रासायनिक खताच्या प्रतिबॅग १00 ते १२५ रुपयांची दरवाढ झालेली आहे. डीझलच्या दरवाढीचा सुद्धा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. सध्याच्या यांत्रिकीकरणामुळे शेतीच्या नांगरणीपासून तर वखरणी, पेरणी, कीटकनाशके फवारणी आदी कामे ट्रॅक्टरद्वारेच केली जात आहेत. त्यामुळे डीझलचे भाव वाढल्याने ट्रॅक्टर मालकांनीसुद्धा भाववाढीचा निर्णय घेतला. शेतकर्‍यांना महागाईचा दुहेरी फटका बसत आहे.७ जूनपासून मृग नक्षत्रास सुरुवात होत आहे. यावर्षी लवकरच पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. परंतु शेतकर्‍यांच्या खिशाची कुठलीच सोय नसून, बँकेच्या कर्जाचीसुद्धा खात्री दिसत नाही. उधार उसणवारी करण्याससुद्धा कुणी तयार नसून, शेतीच्या नांगरणी, वखरणीसाठी ट्रॅक्टर मालकसुद्धा नगदी पैसे मागत असल्याने शेतकरी मोठय़ा अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी