शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील शेतकऱ्यांना दिल्या जात आहेत  रेशीम शेतीचे धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 17:38 IST

बुलडाणा: तुती लागवड करण्यासाठी महा रेशीम अभियान हाती घेण्यात आले असून नागपूर येथे १५ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या अभियानाच्या माध्यमातून विदर्भातील शेतकºयांना रेशीम शेतीचे धडे दिल्या जात आहेत.

बुलडाणा: तुती लागवड करण्यासाठी महा रेशीम अभियान हाती घेण्यात आले असून नागपूर येथे १५ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या अभियानाच्या माध्यमातून विदर्भातील शेतकºयांना रेशीम शेतीचे धडे दिल्या जात आहेत. यातून रेशीम उद्योगाला चालना मिळत असून बुलडाणा जिल्ह्यातही रेशीम रथ यात्रेच्या माध्यमातून गावोगावी रेशीम प्रकाल्पाचे धडे दिले जात आहेत. नवीन तुती लावगड करण्याकरिता उत्सुक असलेल्या शेतकºयांची नोंदणी करण्यासाठी महा-रेशीम अभियान २०१९  हाती घेण्यात आले आहे. हे अभियान १५ ते २९ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. या महा रेशीम रेशीम अभियानाचे उध्दघाटन १५ डिसेंबर रोजी नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांचे हस्ते झाले. या कार्यक्रमात नागपूर शहरात रेशीम रथ यात्रा काढण्यात आली. या प्रसंगी रेशीम पुस्तिका, रेशीम ग्राम संकल्पनेचे अनावरण करण्यात आले. हे महारेशीम अभियान आता   बुलडाणा जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. निवडक गावात रेशीम रथ रेशीम शेतीची माहिती देउन शेतकºयांची रेशीम शेतीसाठी निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकºयांनी नवीन तुती लागवडीकरीता नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा रेशीम कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.  

महारेशीम अभियानाचा प्रचार रथ सज्जजिल्ह्यात २९ डिसेंबर पर्यंत महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानादरम्यान नवीन तुती लागवड करून रेशीम उद्योग करण्यास उत्सुक असलेल्या शेतकºयांची नोंदणी करण्यात येणार आहे. या अभियानाच्या प्रचारासाठी रेशीम रथ तयार करण्यात आला असून या रथाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे  यांचेहस्ते हिरवी झेंडी दाखवून नुकतेच करण्यात आले.

 रेशीम रथ जिल्ह्यातील निवडक गावागावात जावून रेशीम प्रकल्पाची माहिती देणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमतंर्गत रेशीम प्रकल्पास तीन वर्ष अकुशल व कुशल मजूरी मिळून २ लक्ष ९२ हजार रूपयांचा निधी देण्यात येतो. यामध्ये रेशीम किटक संगोपन गृह बांधण्यासाठीची मदतसुद्धा भूधारक (पाच एकर पेक्षा कमी) आहेत. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती