शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

हरभरा व तूर खरेदीचे पैसे न मिळाल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 16:18 IST

मेहकर : शासनाने नाफेड मार्फत शेतकऱ्यांची हरभरा व तूर खरेदी केली आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून खरेदी केलेल्या हरभरा व तुरीचे पैसे न मिळाल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत.

ठळक मुद्दे ६ आॅगस्ट रोजी अनेक शेतकरी मेहकर येथील खरेदी विक्री संघ कार्यालयावर धडकले होते.कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव यांनी तात्काळ खरेदी विक्री कार्यालयाला भेट देवून समस्या जाणून घेतल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क

मेहकर : शासनाने नाफेड मार्फत शेतकऱ्यांची हरभरा व तूर खरेदी केली आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून खरेदी केलेल्या हरभरा व तुरीचे पैसे न मिळाल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. ६ आॅगस्ट रोजी अनेक शेतकरीमेहकर येथील खरेदी विक्री संघ कार्यालयावर धडकले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव यांनी मध्यस्थी करून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना शांत केले. मागील वर्षी मेहकर तालुक्यातील बहुतांश शेतकºयांना हरभरा व तूर पिकांचे चांगले उत्पादन झाले होते. मात्र बाजारामध्ये तूर व पिकांना पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने मातीमोेल किंमतीने हरभरा व तूर विकावी लागली. या पिकांच्या भरोश्यावर शेतकºयांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन होते. मात्र बाजारात भाव नसल्याने शेतकरी हतबल झाले होते. त्यामुळे शासनाने मेहकर तालुक्यात नाफेडचे केंद्र सुरू करून शेतकºयांचे हरभरा व तूर हमी भावाने खरेदी केले होते. परंतु खरेदी केलेल्या हरभरा व तूर पिकांचे पैसे गेल्या चार ते पाच महिन्यापासून मेहकर तालुक्यातील अनेक शेतकºयांना मिळालेच नाही. पैसे मिळण्यासाठी शेतकरी दररोज खरेदी विक्री कार्यालय मेहकर व विविध बँकाकडे चकरा मारत आहेत. या पार्श्वभूमिवर ६ आॅगस्ट रोजी मेहकर तालुक्यातील अनेक शेतकरी खरेदी विक्री कार्यालयावर धउकले होते. माल खरेदी करून चार ते पाच महिने होऊनही पैसे न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले होते. याच वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव यांनी तात्काळ खरेदी विक्री कार्यालयाला भेट देवून शेतकºयांच्या समस्या जाणून घेतल्या व वरिष्ठ अधिकाºयांशी मोबाईलद्वारे संपर्क करून शेतकºयांच्या व्यथा सांगितल्या. यावेळी लवकरात लवकर शेतकºयाच्या खात्यात पैसे जमा होतील, असे आश्वासन वरिष्ठ अधिकाºयांनी दिले. ही माहिती माधवराव जाधव यांनी शेतकºयांना दिल्याने त्यांचा रोष कमी झाला. यावेळी शेतकरी शुभम आसोले, श्रीराम वानखेडे, श्रीकृष्ण अवगळे, गजानन सुरूशे यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

माल खरेदी करूनही नोंदणीच नाही

 शासनाने नाफेड मार्फत मेहकर तालुक्यातील बहुतांश शेतकºयाचे तूर व हरभरा खरेदी केलेली आहे. खरेदी केलेल्या मालाची नोंदणी होणे गरजेचे होते. मेहकर तालुक्यातील जवळपास ११५ शेतकºयांची तूर व हरभरा खरेदी करूनही या शेतकºयांच्या मालाची नोंदणी न झाल्याने त्या शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होण्यास अडचणी येत आहे. शेतकरी दररोज संबंधित विभागाकडे चकरा मारतात. मात्र नोंदणीची वेबसाईटच बंद असल्याने जवळपास ११५ शेतकºयाची तुर व हरभरा पिकांची खरेदी करूनही नोंदणीच झालेली नाही. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकरFarmerशेतकरी