शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

ऑनलाइन नोंदणीनंतरही शेतकरी तूर खरेदीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 14:54 IST

तूरीला हमीभाव मिळावा, यासाठी शेतकरी आॅनलाइन नोंदणीच्या मागे लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : नवीन तूर बाजारात विक्रीसाठी आली आहे. हमीभावाने तूर खरेदीसाठी नाफेडकडे आॅनलाईन नोंदणीची प्रक्रिया १ जानेवारीपासून सुरू झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना तूर खरेदीची प्रतीक्षा लागली आहे.शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, नाफेड अंतर्गत किमान आधारभूत दराने शेतमालाची खरेदी करण्याची व्यवस्था करण्यात येते. तूरीच्या खरेदीसाठी ५ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव ठरवून देण्यात आले आहेत. आधारभूत दराने तुरीची खरेदी करण्यासाठी १ जानेवारीपासून आॅनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू झाली आहे. गेल्या १८ दिवसांमध्ये नोंदणी केलेल्या शेतकºयांची नवीन तूर आता बाजारत आली आहे. परंतू नाफेडची खरेदी आतापर्यंत सुरू झालेली नाही. शेतकºयांची ज्या तालुक्यात जमीन आहे, त्याच तालुक्यातील खरेदी केंद्रावर त्यांची नोंदणी करण्यात येत आहे. त्यासाठी आधारकार्डची छायांकित प्रत, तूर पिकांची नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड संलग्न असलेल्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, तलाठ्याचे पीक पेरा पत्र आदी कागदपत्र सादर करावे लागतात. नोंदणी झालेल्या शेतकºयांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार माल आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येते. यंदा खरीप हंगामात शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. तूर पिकाला सुद्धा फटका बसला. अतिपावसाच्या या संकटातून वाचलेल्या तूरीचा हंगाम आता अंतीम टप्प्यात आहे. अनेकांची तुरीची काढणी पूर्ण झाली आहे. नोंदणीसाठी १५ फेब्रुवारीची अंतीम मुदत देण्यात आली आहे. तूरही शेतातून घरात आली आहे. तूरीला हमीभाव मिळावा, यासाठी शेतकरी आॅनलाइन नोंदणीच्या मागे लागले आहेत. लवकरच होणार खरेदीला सुरूवातनाफेडकडे तूर खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू आहे. मात्र त्याला अपेक्षीत प्रतिसाद यंदा मिळत नाही. आतापर्यंत झालेल्या नोंदणीदार शेतकºयांसाठी लवकरच नाफेडकडून तूर खरेदी सुरू होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मागील वर्षीची चुकारेही देण्यात आले असून, त्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुदतीमध्ये शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन नाफेडकडून करण्यात आले आहे.तूरीला साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल भावतूर पिकाचा हमीभाव ५ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल आहे. परंतू सध्या नाफेडकडून हमीभावाने तूर खेरीद सुरू झालेली नाही. त्यामुळे तूरीला व्यापाºयांकडून सरासरी ४ हजार ६५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे क्विंटलमागे एक ते दीड हजार रुपयांचा फटका तूर उत्पादक शेतकºयांना बसत आहे.

नोंदणीसाठी कागदपत्रांची जुळवा-जुळवहमीभावाने तूर खरेदीसाठी १५ फेब्रुवारीची अंतीम मुदत देण्यात आली आहे. या महिन्याभरामध्ये सातबारावर पिकाची नोंद, तलाठ्याकडून पीक पेरा पत्र, बँक खात्याला आधार कार्ड संलग्न आदी कागदपत्रांची जुळवा-जुळव करण्यात येत आहे. परंतू अनेकवेळा तलाठीच हजार राहत नसल्याची ओरड शेतकºयांमधून होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी