शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

बियाणांच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 11:18 IST

Agriculture News : यंदा खरीप हंगामाची पूर्वतयारी झाली; पण बियाणांची तडजोड कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : सोयाबीन बियाणांची इतर बियाणांच्या तुलनेत झालेली दीडपट वाढ शेतकऱ्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे जिल्हाभरात सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट आल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला होता. यंदा खरीप हंगामाची पूर्वतयारी झाली; पण बियाणांची तडजोड कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असून, त्यांना दरवाढीचा शॉक बसला आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनच्या उत्पन्नातून नफा तर सोडा साधा लागवड खर्चही निघाला नाही. सोयाबीनचे उत्पादन न झाल्याने शेतकऱ्यांकडे बियाणांसाठी सोयाबीन शिल्लक राहिली नाही. दरवर्षी बरेच शेतकरी पुढील हंगामाच्या पेरणीसाठी उत्पादित सोयाबीनमधून बियाणांसाठी सोयाबीनची साठवणूक करून ठेवत होते. मात्र, यावर्षी तसे झाले नाही. मागील वर्षीच्या उत्पादनात कमालीची घट आल्याने बँकांचे, सावकारांचे व उसनवारीच्या कर्जाची परतफेड शेतकऱ्यांना करता आली नाही. यामुळे खरीप हंगामातील पेरणीसाठी बियाणे आणावे कुठून, अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. आधीच लॉकडाऊनने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना आता बियाणांची होणारी दरवाढ शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणारी आहे. 

बियाणांच्या दरवाढीचा परिणाम शेतकऱ्यांसह कृषी केंद्रचालकांवरही झाला आहे. मागील वर्षी सोयाबीनच्या उत्पादनात घट झाल्याने या खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा घटण्याची शक्यता आहे. भाववाढीमुळे बियाणे खरेदी करतेवेळी दुकानदारांनाही विचार करावा लागेल. -संतोष देशमुख, कृषी केंद्रचालक

मागील हंगामातील सोयाबीनची सोंगणीच करावी लागली नव्हती. यामुळे उत्पादन शून्य झाले. तसेच कपाशीवर बोंडअळी आल्याने उत्पादनात घट आली. यामुळे लागवड खर्चही फसला आणि आता सोयाबीनच्या बियाणांमध्ये झालेली दीडपट वाढ शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी ठरत आहे. -भास्कर तायडे, शेतकरी

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी