शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

कांदा लागवडीकडे शेतकर्‍यांनी फिरविली पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:10 IST

गतवर्षी कांदा बियाण्याला भाव न मिळाल्यामुळे या वर्षीच्या रब्बी हंगामामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी कांदा लागवडीकडे पाठ फिरविली असल्याचे चित्र आहे. 

ठळक मुद्देकांदा बियाण्याला भाव न मिळण्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कइसोली : इसोली परिसरासह या भागात थोड्याफार प्रमाणात का होईना काही शेतकरी कांदा लागवड करून विक्री करण्याचा तर काही शेतकरी खाण्याच्या उपयोगात येणार्‍या कांद्याची लागवड या महिन्यामध्ये करतात; परंतु मागील वर्षी कांदा बियाण्याला भाव न मिळाल्यामुळे या चालु वर्षीच्या रब्बी हंगामामध्ये एकाही शेतकर्‍याने कांदा बियाणे लागवड तर खाण्याचा कांदा या दोन्ही प्रकाराच्या कांदा लागवडीस कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी पाठ फिरविली असल्याचे चित्र दिसत आहे. इसोली परिसरामध्ये धानोरी, सावरखेड खुर्द, सावरखेड बु., मंगरूळ नवघरे, हराळखेड, पिंपरखेड या गावामधील शेतकरी या महिन्यामध्ये रब्बी हंगामातील कांदा पिकाची लागवड करीत असतात. नगदी पैशाचे पीक म्हणून कांद्याच्या बियाण्याला ७0 ते ८0 हजार रुपये क्विंटल या दराने भाव असतो. असे कांदा बियाणे या महिन्यामध्ये नाशिक, कळवळ, जालना, निफाड अशा बाहेरील जिल्ह्यामधून कांदा विकत आणून त्याची लागवड करतात. त्यावरील खर्च पाहता कांदा लागवड करून बियाणे मात्र हमीभाव नसल्याने तर मागील वर्षी ७0 ते ८0 हजार रुपये क्विंटल दराने आपणाकडून कांदा बियाणे विकत घेतल्या जाईल, असे व्यापारी कांदा बियाणे देतावेळी करार हा शेतकर्‍यांसोबत करतो; मात्र सदर व्यापार्‍यांनी कांदा बियाण्याला भाव नसल्याचे कारण सांगत तो यावर्षी १७ ते १८ हजार रुपये दराने विक्री करून घेतला, त्यामुळे त्याचा खर्च पाहता सदर कांदा बियाणे लागवड शेतकर्‍यांना न परवडणारा असल्याने या परिसरातील शेतकर्‍यांनी अजूनही कांदा लागवड केली नाही. तर हराळखेड येथील काही शेतकर्‍यांनी तर कांदा लागवड करण्यासाठी नाशिक, निफाड, कळवळ येथील व्यापार्‍यांशी संवाद साधला की कांदा विकत घेतो, परंतु ठरल्याप्रमाणे त्याचे बियाणे घ्यावे लागेल, मात्र व्यापार्‍यांनी जे भाव ठरतील त्याच भावाने तुम्हाला कांदा बियाणे घ्यावे लागेल. त्यामुळे सदर कांदा लागवडीचा खर्च, फवारणी, इत्यादी त्यावर होणारा खर्च न परवडणारा असल्याने नकार दिला. हराळखेड संग्राह तलावातील पाणी उपसा शासकीय अधिकार्‍यांनी बंद केला तर एम.एस.ई.बी.ने त्यावरील वीज पुरवठा खंडित केला, त्यामुळे ओलीताचे होणारे क्षेत्र कमी झाले आहे, तसेच मागील वर्षी तयार झालेले बियाणे कमी भावाच्या अभावामुळे सदर बियाणे घरात पडून असल्यामुळे इसोली या परिसरातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी कांदा लागवडीसाठी पाठ फिरविली असून, अद्याप पावेतो लागवड झाली नसल्याचे दिसून येत आहे. -

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला काँग्रेस सेवादलाचा मोर्चा!कोट्यवधींचा भ्रष्टाचार करणार्‍या ‘आरएफओ’वर कारवाईची मागणीजिल्हा कार्याध्यक्ष मोहन बाभुळकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादरलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शासनाच्या पैशाचा दुरूपयोग करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या जळगाव जामोद येथील आरएफओ विरुद्ध कारवाई करावी, यासह इतर मागण्यांसाठी काँग्रेस सेवादलाचे जिल्हा कार्याध्यक्ष मोहन बाभुळकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.स्थानिक गांधी भवन येथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर काँग्रेस सेवादलाचे मोहन बाभुळकर, गौतम मोरे, अभय मोरे, प्रवीण गाडेकर, तुळशीरावम नाईक, नीलेश हरकल, शेख मुजूभाई, शैलेश खेडेकर, अँड.विशाल गवई आदींनी जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात नमूद केले आहे की, जळगाव जामोद येथील आरएफओ कांबळे यांनी पदाचा दुरूपयोग करून शासनाच्या पैशाचा दुरूपयोग करून वरिष्ठ अधिकार्‍यांशी संगनमत करून भ्रष्टाचार केला आहे. याबाबत दखल घेऊन सोनाळा येथे शेतकर्‍याच्या शेतात पुरलेले अस्वल प्रकरण, सोनबर्डी बिटमध्ये कुजलेले अस्वल आढळले, एकामागे एक तीन अस्वल कुजलेल्या अवस्थेत सापडले, तरीसुद्धा कार्यवाही शून्य आहे. त्यामुळे अस्वलाच्या अवयवांची तस्करी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मौजे मेढामारी कंपार्टमेंटमध्ये ३.७0 हे.आर. अतिक्रमणाबाबत कारवाईस टाळाटाळ होत आहे. कंपार्टमेंट ६२१ मध्ये २0 मेंढपाळांचे कुटुंब तीन हजार मेंढय़ांसह, जळगाव जामोद वनक्षेत्रात काठेवाडी गुरे दोन हजार गायी व १0 कुटुंबे राहतात. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, असे नमूद केले आहे. या मोर्चात जवळपास १५0 पेक्षा जास्त सेवादलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. -

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी