सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील जागदरी (शेंदुर्जन) येथील तीन शेतकर्यांना त्यांच्या भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला म्हणून ५0 लाख १४ हजार ६२६ रुपये मिळाले आहेत. मोबदला न मिळाल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णमध्ये २९ सप्टेंबरला प्रकाशित होताच जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी तात्काळ दखल घेतली आणि ३0 सप्टेंबरला तिन्ही शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. शेंदुर्जन, जागदरी शिवारात सन २0१0-११ मध्ये पाझर तलाव घेण्यात आला होता. त्या तलावासाठी रंगनाथ लिंबाजी डोईफोडे, कमल शिवाजी पालवे, सुभाष उत्तमराव जायभाये यांची जमीन संपादित केली होती. शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतरही भूसंपादन विभागाकडून तिन्ही शेतकर्यांना टोलवाटोलवीची उत्तरे मिळत होती. त्यामुळे रंगनाथ डोईफोडे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. यासंदर्भात सविस्तर माहिती ह्यलोकमतह्णमध्ये २९ सप्टेंबरला प्रसिद्ध करण्यात आली. या वृत्ताची दखल घेऊन जिल्हाधिकारी कुरुंदकर यांनी भू-संपादन अधिकारी डॉ. विवेक घोडके यांना आदेश देऊन प्रकरण मार्गी लावण्याचे आदेश दिले. डॉ. विवेक घोडके यांनी रंगनाथ डोईफोडे यांच्या खात्यात ३५ लाख ७६ हजार ४४५ रुपये, कमल पालवे यांच्या खात्यात ११ लाख ९३ हजार ४१२ रुपये आणि सुभाष जायभाये यांच्या खात्यात २ लाख ४४ हजार ७६९ रुपये धनादेशाद्वारे जमा केले. दरम्यान, ३0 सप्टेबरला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय अंभोरे, तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे, काँग्रेस नेते बद्री वाघ, रंगनाथ डोईफोडे, समाधान हेलोडे, डॉ. पुरुषोत्तम देवकर यांनी जिल्हाधिकारी कुरुंदकर यांनी तात्काळ काम केल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
जागदरी येथील शेतक-यांना भूसंपादनाचे ५0 लाख मिळाले
By admin | Updated: October 1, 2015 00:19 IST