शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यासाठी मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 17:26 IST

बुलडाणा : मेहकर तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ताच उपलब्ध नाही. त्यामुळे शेतरस्त्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मधुकराव गवई व पंचफुलाबाई अंभोरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 

ठळक मुद्देशेतात जाण्याचा रस्ता बंद करण्यात आल्याने शेतकºयांना शेतात जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. पिंपळगाव उंडा येथील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

बुलडाणा : मेहकर तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ताच उपलब्ध नाही. त्यामुळे शेतरस्त्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मधुकराव गवई व पंचफुलाबाई अंभोरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. पिंपळगाव उंडा ता.मेहकर येथील  ई-क्लास शेती गट नं.२९६ मध्ये प्रत्येकी ०.८० हे.आर. ते १.०० हेक्टर जमिनीवर सन १९७८ साली काही शेतकºयांनी अतिक्रमण केले होते. त्यानंतर १९९१ मध्ये जमिनीचा भाडेपट्टा सुध्दा त्यांना मिळाला आहे. भाडेपट्टा मिळाला तेव्हापासून शेतकरी शेती वहिती करीत आहे. शेतात जाण्यासाठी जुनी वहिवाटी असलेला रस्ता गट नं.२९४ कैलास जनार्धन सोनुने, गट नं.२९५ दिलीप उत्तम काळे, गट नं.२९५ सुशिला सुभाष काळे यांच्या धुºयाने बैलगाडीचा वहिवाटी रस्ता होता. याच रस्त्याने सर्व लोक शेती वहिती करीत होते. परंतु शेतात जाण्याचा रस्ता बंद करण्यात आल्याने शेतकºयांना शेतात जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शेत रस्त्याच्या मागणीसाठी मधुकराव गवई व पंचफुलाबाई अंभोरे यांच्या नेतृत्वात पिंपळगाव उंडा येथील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणामध्ये ननहरी सिताराम अंभोरे, शामराव भिवसन कव्हळे, दामोधर जाधव, संतोष आंभोरे, भिमसन नाटेकर, भिमराव आंभोरे, संतोष आंभोरे, सोनाबाई क व्हळे, सुखदेव वानखेडे, सुशिलाबाई आंभोरे, दिपक आंभोरे, मंडाबाई आंभोरे, दगडाबाई जाधव, मालताबाई आंभोरे, रमाबाई आंभोरे, आकाश नाटेकर, विलास क व्हळे यांचा सहभाग आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकरFarmerशेतकरी