शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

शेगावात नाफेड केंद्रावर शेतकऱ्यांची निदर्शने; अद्याप खरेदी नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 2:17 PM

येथील नाफेड खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी केंद्रावर निदर्शने केली. शेगाव येथे नाफेड अंतर्गत उडीद, मूग, सोयाबिनची खरेदी अद्यापही सुरू झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

शेगाव : येथील नाफेड खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी केंद्रावर निदर्शने केली. शेगाव येथे नाफेड अंतर्गत उडीद, मूग, सोयाबिनची खरेदी अद्यापही सुरू झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अद्याप नाफेड केंद्र सुरु न झाल्याने शेतकऱ्यांना शेतमालाची बेभाव विक्री करावी लागत आहे. आधीच अत्यल्प पावसामुळे उत्पादन खूपच कमी होवून पेरणीचाही खर्च निघाला नाही. आता जेवढा शेतमाल घरात आला, तो विनादर द्यावा लागत आहे. सरकार हमी भावाने खरेदी करून काहीतरी आधार मिळेल, अशी आशा असताना हंगाम संपत आला, तरी शेगाव येथील नाफेड केंद्र अद्याप सुरु झालेले नाही. शेतकरी गजानन लहाने यांनी याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फोन सकाळपासूनच नॉट रिचेबल येत आहे. त्यानंतरही अनेक शेतकऱ्यांनी संपर्क केला. पण, काही उपयोग झाला नाही. त्यामुळे  येथील केंद्र कधी सुरू होणार याची साधी माहितीही मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.नाफेड केंद्रावर शेतकरी गजानन लहाने, शंकर लोखंडे, संतोष शेगोकार, विजयसेठ काठोळे, व्यंकटेश घाटोळ, रविंद्र धुमाळे, नरेंद्र खेट्टे, चक्रधर लोखंडे, संदीप काठोळे, प्रवीण शेगोकार, नंदकिशोर पोटे, शोभाबाई सोनोने, सचिन देशमुख, गजानन भोंडेकर आदींसह शेतकरी बांधवांनी निदर्शने करून डीएमओचा निषेध केला. शासनाने शेगाव येथील नाफेड केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे .  

टॅग्स :buldhanaबुलडाणाShegaonशेगाव