शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

विद्युत टॉवरमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना दुप्पट मोबदला मिळणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:20 IST

बुलडाणा : ३१ मे २0१७ च्या शासन निर्णयानुसार शेतकर्‍यांना नुकसानीचा दुप्पट मोबदला मिळणार आहे, यासाठी प्रत्येक विद्युत टॉवरग्रस्त शेतकर्‍यांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन टॉवर विरोधी कृती समिती, महाराष्ट्रचे अध्यक्ष मिलिंद पाटील व अनिल नागरे यांनी केले आहे.

ठळक मुद्देनुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी अर्ज दाखल करावे - कृती समितीचे अध्यक्ष मिलिंद पाटील

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ३१ मे २0१७ च्या शासन निर्णयानुसार शेतकर्‍यांना नुकसानीचा दुप्पट मोबदला मिळणार आहे, यासाठी प्रत्येक विद्युत टॉवरग्रस्त शेतकर्‍यांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन टॉवर विरोधी कृती समिती, महाराष्ट्रचे अध्यक्ष मिलिंद पाटील व अनिल नागरे यांनी केले आहे.महाराष्ट्र राज्यामध्ये सन २00८ पासून ४00 के.व्ही. व त्यापुढील विद्युत लाइनची कामे सुरू झाली, ही कामे करताना शेतकर्‍यांना नुकसानीचा योग्य मोबदला दिला जात नव्हता. यासाठी टॉवर विरोधी कृती समिती, महाराष्ट्रचे अध्यक्ष मिलिंद पाटील व सरचिटणीस अनिल नागरे यांनी संपूर्ण राज्यात विद्युत टॉवरग्रस्त शेतकर्‍यांना मोबदला मिळावा, यासाठी आंदोलने केली. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात मंत्रालयात जवळपास ४0 बैठका घेतल्या आणि महाराष्ट्र शासनाने ३१ मे २0१७ रोजी जाहीर केले असून, राज्यातील ६६ के.व्ही. व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या अतिउच्चदाब पारेषण वाहिनीच्या व्याप्त जागेच्या मोबदल्यात वाढ करण्याबाबत व वाहिनीच्या तारेखालील जमिनीचा मोबदला देणे बाबतचे धोरण तयार केले आहे. त्यानुसार सदर अर्ज विद्युत टॉवरग्रस्त व विद्युत टॉवरच्या तारेखालील आलेल्या जमिनीच्या नुकसानीचा मोबदला मिळावा, यासाठी अर्ज करावयाचा आहे. चंद्रपूर, नागपूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली, सोलापूर, अहमदनगर, धुळे, जळगाव या जिल्ह्यातून जास्त टॉवर गेले असून, राज्यात एकूण १ लाख ५0 हजार टॉवर असून, २ टॉवरमधील अंतर १ हजार फूट आहे. या दोन टॉवरमध्ये ५/७ शेतकर्‍यांच्या शेतावरून विद्युत तार जाते. राज्यात एकूण ७ ते ८ लाख शेतकर्‍यांना याचा फटका बसलेला आहे.विद्युत टॉवरखाली आलेल्या जमिनीचे क्षेत्र मोजून त्या क्षेत्राच्या दीडपट करून तसेच जमिनीचा त्या भागातील रेडिरेकनरचा दर दुप्पट करून मोबदला द्यायचा आहे. यापूर्वी विद्युत टॉवरग्रस्त शेतकर्‍यांना जो मोबदला देण्यात आला, तो मोबदला पिकाच्या नुकसानीचा असून, जी कंपनी संबंधित काम करीत आहे, त्यांनी दिलेला आहे. त्यांनी जमिनीचे मूल्यांकन काढून नुकसानाचा मोबदला दिलेला नाही. तसेच विद्युत टॉवरग्रस्त शेतकर्‍यांच्या ७/१२ वर टावरची नोंद घेतलेली नाही. आता टॉवरची नोंद ७/१२ वर घेणे बंधनकारक झाले आहे.त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांनी टॉवरची नोंद त्वरित करावी, तसेच ३१ मे २0१७ च्या शासन निर्णयानुसार शेतकर्‍यांना नुकसानाचा मोबदला मिळावा, यासाठी प्रत्येक विद्युत टॉवरग्रस्त शेतकर्‍यांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन टॉवर विरोधी कृती समिती, महाराष्ट्रचे अध्यक्ष मिलिंद पाटील व अनिल नागरे यांनी केले आहे. - 

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरी