शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पिक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 14:07 IST

सीएससी सेंटर चालकाने विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीकडे भरली नसल्यामुळे ३५७ शेतकरी पिक विम्यापासून पासून वंचित राहिले.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपुर : अस्मानी संकटे झेलणाºया बळीराजावर संकटांची मालिका थांबता थांबत नसल्याने करावे तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पिक विम्याच्या नावाखाली एका शेतकºयाने फसवणूक झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनला सादर केली आहे.पाण्यामुळे सर्वच पिके उध्वस्त झाल्याने येथील शेतकरी देशोधडीला लागला. निसर्गापुढे हतबल झालेल्या बळीराजाचे आवाज शासन दरबारी पोहचत नसल्याचे चित्र असतांना आता पिक विम्यापासुन वंचित राहण्याची वेळ शेतकय्रांवर आली आहे. संग्रामपुर तालुक्यातील असंख्य शेतकय्रांनी सिएससी सेंटर वर १३ जुलै २०१८ रोजी पिक विम्याचा हप्ता भरला असता सेंटर चालकाकडुन रितसर शेतकय्रांना पैसे भरल्याचे पावती देण्यात आली. यावरून बराच अवधी उलटुन गेला. हवामानावर आघारीत पिक विमा असल्याने शासकीय निकशानुसार सदर पिक विमा लागू झाला. पिक विमा कंपणीकडुन बहुतांश शेतकºयांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करण्यात आली तर असंख्य शेतकरी पिक विम्याच्या लाभापासुन वंचित राहले. हप्ता भरल्यावर देखिल लाभ मिळत नसल्याने शेतकºयांनी पिक विमा कंपनीकडे याबाबत जाब विचारला. कंपनीने या प्रकरणा संबधी चौकशी केली असता वंचित शेतकय्रांनी पिक विम्याचा हप्ता भरला नसल्याचे निदर्शनात आले.त्यामुळे कंपणीने विम्याची रक्कम देण्यास नकार दिल्याने बनावट पावती आधारे आपली फसवणुक झाल्याचे आरोप शेतकय्रांनी केले. पिक विम्याच्या हप्त्याची रक्कम ही व लाभापासुन वंचित राहावे लागले असल्याने १४ नोव्हेंबर शेतकºयांनी तामगाव पोलिस गाठत फसवणुक झाली असल्याचे निवेदन दिले. संग्रामपुर तालुक्यातील पातुर्डा येथील सीएससी सेंटर चालक धिरज चांडक व केतन चांडक यांनी फसवणुक केली असल्याचे निवेदनात नमुद आहे. दोघांवर कठोर कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा ईशारा या निवेदनातुन करण्यात आला. निवेदनावर शेतकरी संघटनेचे रमेश बनाईत, हमीद पाशा, श्रीराम मिसाळ आदींच्या सह्या आहेत. शेतकºयांच्या फसवणुक संदर्भात पोलिस स्टेशनला निवेदन प्राप्त झाले असुन या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.- भुषण गावंडेठाणेदार तामगाव पोलिस स्टेशनसंग्रामपूर तालुक्यातील शेतकºयांनी पातुर्डा येथील सीएससी सेंटर वरून खरीप पिकाचा २०१८ मध्ये विमा उतरला होता. सीएससी सेंटर चालकाने विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीकडे भरली नसल्यामुळे ३५७ शेतकरी पिक विम्यापासून पासून वंचित राहिले. सीएससी संचालकांविरुद्ध कारवाई करून शेतकºयांना न्याय मिळवून द्यावा.- रमेश बानाईत, जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना बुलढाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीSangrampurसंग्रामपूर