शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हय़ातील शेतकर्‍यांचा फलोत्पादन अभियानाकडे कल वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 23:56 IST

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाची अंमलबजावणी हॉर्टनेटच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानांतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यात अमरावती विभागातून बुलडाणा हा अव्वल असून, राज्यातून चवथ्या क्रमांकावर आहे.

ठळक मुद्देपाच हजारांवर शेतकर्‍यांची ऑनलाइन नोंदणी  अमरावती विभागातून बुलडाणा जिल्हा अव्वल!

लोकमत विशेषलोकमत न्यूज नेटवर्कहिवरा : राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाची अंमलबजावणी हॉर्टनेटच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानांतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यात अमरावती विभागातून बुलडाणा हा अव्वल असून, राज्यातून चवथ्या क्रमांकावर आहे. बुलडाणा जिल्हय़ातील सन २0१७-१८ या वर्षाकरिता आजपर्यंत एकूण ५ हजार ५00 शेतकर्‍यांनी या हार्टनेट प्रणालीचा अर्ज भरण्यासाठी उपयोग केलेला आहे.या ऑनलाइन पद्धतीमध्ये शेतकरी स्वत: किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या विविध घटकांचे अर्ज भरु शकतात. हा ऑनलाइन अर्ज केल्यानंतर ओळखपत्रासह सदर अर्ज कागदपत्रासह तीन प्रतीत संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावा लागतो. यानंतर या अर्जाची पुढील सर्व प्रगती ऑनलाइन पद्धतीने होत राहते. अर्ज रखडला कुठे, का रखडला, हे कळते. शिवाय अनुदान मंजूर झाल्यानंतर ते थेट लाभार्थी शेतकर्‍यांच्या बॅंक खात्यात जमा होते. यामुळे शेतकर्‍यांच्या प्रस्तावास होणारा व अनुदानासाठी होणारा विलंब या दोन्ही बाबीमध्ये तत्काळ कार्यवाही होणार असल्यामुळे याचा फायदा शेतकर्‍यांना होणार आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सामूहिक शेततळे, कांदा चाळ, फलोत्पादन यांत्रिकीकरण अंतर्गत २0 एच.पी.ट्रॅक्टर, शेडनेट हाडव, पॉलीहाऊस काही घटकासाठी शेतकरी अर्ज करीत आहेत.

शेतकर्‍यांना मिळतो लाभ क्रमांकएकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा योजनेच्या लाभासाठी प्रथम अर्ज करताना संकेतस्थळावर शेतकर्‍यांची नोंदणी केली जाते. यात वैयक्तिक, पिकाविषयीची व इतर माहिती नोंदवली जाते. यानंतर सदर शेतकर्‍याला भ्रमणध्वनीवर एक लाभधारक खाते क्रमांक दिला जातो. या क्रमांकाचे खाते उघडून शेतकर्‍याला योजनेचा अर्ज भरणे, अर्जाची प्रगती पाहणे यासारखा प्रक्रिया करता येतात.

काय आहे हॉर्टनेट प्रणालीया अभियानाची केंद्रीय विभागामार्फत हॉर्टनेट संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. त्यात राज्यांच्या नावांची यादी आहे. त्यातील महाराष्ट्र या शब्दावर क्लिक केल्यावर महाराष्ट्राचे संकेतस्थळ खुले होते. यावर प्राथमिक माहिती जसे ओळखपत्र क्रमांक, आधार क्रमांक, बचत खाते क्रमांक, पॅन क्रमांक, शेतीचा गट क्रमांक, ८ अ चे क्षेत्र आदी स्वरुपात भरली जाते. त्यानुसार अर्ज दाखल करण्यापासून अनुदान मिळेपर्यंतची सर्व कार्यवाही ही याच हॉर्टनेट प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

हॉर्टनेट ही सुविधा शेतकर्‍यांसाठी अतिशय सोईस्कर आहे. शिवाय फलोत्पादन अभियानातील योजनेच्या लाभासाठी शेतकर्‍यांनी या प्रणालीमार्फत अर्ज करणे बंधनकारक आहे. तेव्हा शेतकर्‍यांनी या प्रणालीमार्फत कृषी विभागात अर्ज करणे आवश्यक असून, शेतकर्‍यांनी फलोत्पादन अभियानातील योजनेचा लाभ घ्यावा.- प्रमोद लहाळेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी