शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बोरखेड येथील शेतकर्‍यांनी उभ्या पिकात चारली मेंढरं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 01:21 IST

बोरखेड : यावर्षी खरिपाचे उडीद, मूग सोयाबीनच्या पाठोपाठ कपाशीच्या उत् पादनात आलेली मोठी घट, त्यामुळे  बरेच शेतकर्‍यांचा पिकाला लागलेला  खर्च निघाला नसल्यामुळे वैतागून काही शेतकर्‍यांनी  उभ्या कपाशीच्या शेतात  आजही मेंढरे घातल्याचे दृश्य दिसत आहे.

ठळक मुद्देकपाशीवर लाल बोंडअळीचे आक्रमण शेतकर्‍यांवर आर्थिक संकट

 लोकमत न्यूज नेटवर्कबोरखेड : यावर्षी खरिपाचे उडीद, मूग सोयाबीनच्या पाठोपाठ कपाशीच्या उत् पादनात आलेली मोठी घट, त्यामुळे  बरेच शेतकर्‍यांचा पिकाला लागलेला  खर्च निघाला नसल्यामुळे वैतागून काही शेतकर्‍यांनी  उभ्या कपाशीच्या शेतात  आजही मेंढरे घातल्याचे दृश्य दिसत आहे.संग्रामपूर तालुक्यातील यंदा जास्तीत जास्त शेतकर्‍यांची खरिपाची  पिके  पेरणीयोग्य पाण्याअभावी उलटली. पुन्हा शेतकर्‍यांना व्याजाने पैसे काढून शेतात  दुबार-तिबार पेरणी करावी लागली. अखेर पीक डोलत असताना सप्टेंबर  महिन्यात अचानकपणे रोज पहाटे धुके सतत आठ दिवस पडले व वातावरणा तील बदलामुळे उडीद, सोयाबीनच्या झाडांच्या शेंगा पोकळ राहिल्या. त्यामुळे ही  पिके तोट्यात गेली. त्यापाठोपाठ कपाशीची झाडे लाल होऊन पानराळ झाली.  त्यामुळे कमी वजनाचे बोंडे फुटू लागली. अशातच शेंदर्‍या अळीने मोठे  आक्रमण केले. त्यामुळे हे कपाशीचे पीक मजुरीलाही परवडणारे नसल्याने,  बोरखेड, वारखेड, दानापूर, बल्हाडी सोगोडा आदी गावात शेतकर्‍यांनी क पाशीच्या शेतात बरेच मेंढरे घातली. महसूल विभागाने अंतिम पीक आणेवारी  योग्य काढावी, शेतकर्‍यांनी काढलेल्या पीक विमा त्वरित मंजूर करून  शासकीय मदत मिळण्याची मागणी  जोर धरत आहे. 

शेतकरी हवालदिल वातावरणातील बदलामुळे शेतकर्‍यांवर वारंवार संकट कोसळत आहे. उडीद,  मूग, सोयाबीनपाठोपाठ आता कपाशीच्याही पिकावर संकट कोसळले आहे.  त्यामुळे शेतकर्‍यांवर आर्थिक संकटाचे सावट आणखी गडद होत असल्याचे  दिसून येते. पीक लागवडीचा खर्चही निघत नसल्याने, शेतकरी हवालदिल  झाला आहे.

यंदा कपाशी पिकावर अज्ञात रोगाचा प्रसार तसेच शेंदर्‍या अळीने बोंड्यावर  केलेले आक्रमण त्यामुळे पीक  तोट्यात गेले. अखेर संतापून उभ्या कपाशीच्या  पिकात मेंढरे घातली. - मोहन बारब्दे, शेतकरी बोरखेड.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती