शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’ आपत्तीत बळीराजाची लूट : शंभर रूपयांच्या स्टॅम्पसाठी २०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 10:32 IST

पाचशे रूपयांचा स्टॅम्पपेपरही अव्वाच्या सव्वाभावाने खरेदी करावा लागत असल्याचे दिसून येते.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शेतकऱ्यांना पिक कर्जासाठी आवश्यक असलेले शंभर रुपयांचे स्टॅम्प पेपर खामगावात उपलब्ध नाहीत. त्याचवेळी अतिरिक्त पैसे मोजल्यास शंभर रूपयांचा स्टॅम्प तात्काळ उपलब्ध होत असल्याचा प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आला. शंभर रूपयांऐवजी अनेक शेतकऱ्यांना नाईलाजास्तव पाचशे रूपयांचा स्टॅम्पपेपरही अव्वाच्या सव्वाभावाने खरेदी करावा लागत असल्याचे दिसून येते.काही शेतकºयांच्या पेरण्याही आटोपल्या आहेत. दरम्यान, पीककर्ज, कोणत्याही बँकेचे कर्ज नसल्याचे पत्र, तसेच इतर कर्जासाठी बँकाना प्रतिज्ञालेख देण्यासाठी स्टॅम्प पेपरची आवश्यक आहे. मात्र, खामगाव येथे गत काही दिवसांपासून १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला आहे. काही मुद्रांक विक्रेत्यांनी शंभर रूपयांचा स्टॅम्प उपलब्ध नसल्याचे फलक लावले आहे. मात्र, शंभर रूपयांच्या स्टॅम्प पेपरसाठी अतिरिक्त पैसे मोजल्यास तात्काळ स्पॅम्प उपलब्ध होत आहे. त्याचवेळी शेतकºयांनी निकड लक्षात घेत, काही मुद्रांक विक्रेते शेतकºयांना ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरचीही विक्री करीत आहेत. ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरचीही चढ्या भावाने विक्री होत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले. दुय्यम निबंधक आणि महसूल प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसते.असे केले स्टिंग आॅपरेशन!खामगावात स्टॅम्प पेपरचा कृत्रिम तुटवडा तसेच चढ्या भावाने स्टॅम्प पेपरची विक्री होत असल्याचे निर्दशनास आले. त्यानंतर ‘लोकमत’ने एका वार्ताहरास शेतकरी म्हणून स्टॅम्प पेपर घेण्यास पाठविले. त्यावेळी सुरूवातीला स्टॅम्पपेपर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. शंभर रूपयांचा स्टॅम्प शेगाव येथे उपलब्ध असल्याचे विक्रेत्याने सांगितले. त्यावेळी काही शिल्लक रक्कम देण्याची तयारी दर्शविल्यानंतर तात्काळ १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर उपलब्ध झाला.

शंभर रूपयांच्या स्टॅम्प पेपरचा कृत्रिम तुटवडा तसेच चढ्या भावाने विक्री केल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यासंदर्भात नायब तहसीलदारांमार्फत चौकशी तसेच तपासणी केली जाईल. संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.- शितल रसाळतहसीलदार, खामगाव.

सुरूवातीला स्टॅम्प पेपर उपलब्ध नसल्याचे सांगितल्या जाते. अतिरिक्त पैसे देण्यास तयार झाल्यास ताबडतोब स्टॅम्प उपलब्ध केल्या जातो. आपल्याकडून शंभर रूपयांच्या स्टॅम्पसाठी २०० रुपये घेण्यात आले.   - अनिल आखरे, शेतकरी, बोरीअडगाव ता. खामगाव.

 

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी