शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील येथील घटना

By निलेश जोशी | Updated: November 17, 2023 19:31 IST

धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार या प्रकरणात समोर आला आहे.

मोताळा/धामणगाव बढे : मोताळा तालुक्यातील रिधोरा खंडोबा येथील शेतकरी सुरेश शिवराम कळमकर (४०) यांचा मधमाशांच्या हल्ल्यात १७ नोव्हेंबर रोजी सकाळी मृत्यू झाला. दुचाकीवर शेतात जात असतांना एका नाल्याच्या काठीही घटना घडली. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता ते शेतात जात होते. रिशोदार शिवारातच त्यांच्यावर मधमाश्यांनी हा हल्ला केला. मधमाशांचा हल्ला होत असतांनाही त्यांनी त्यांच्याबाबत घडत असलेल्या या प्रकाराची माहिती गावातील मित्राला फोन लावून दिली. त्यानंतर गावातून काही लोक तातडीने घटनास्थळी गेले. तेव्हा घटनास्थळी सुरेश कळमकर हे ग्रामस्थांना बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना तातडीने धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना बुलढाणा येथे उपचारासाठी हलविण्यात आले. परंतु बुलढाणा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतक सुरेश कळमकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई ,वडील व भाऊ, बहिण असा आप्त परिवार आहे.

रुग्णवाहिका असूनही खासगी वाहनाचा आधार धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार या प्रकरणात समोर आला आहे. मृकाच्या नातेवाईकांनी त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जखमी अवस्थेत सुरेश कळमकर यांना धामणगाव बढे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणण्यात आल्यानंतर डॉक्टरांना त्यांच्या निवासस्थानामधून बोलावून आणावे लागले. दुसरीकडे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध असताना त्यावरील चालक नव्हता. परिणामी खासगी वाहनाचा शोध घेऊन त्या वाहनाद्वारे सुरेश कळमकर यांना बुलडाणा येथे हलवावे लागले. या प्रकाराबाबात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDeathमृत्यूFarmerशेतकरी