शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांचे लक्ष विचलित करण्यासाठी बाजार समितीवर खोटे आरोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:16 IST

चिखली: महाराष्ट्रातील शेतकरी आजरोजी सोयाबीन, तूर, ऊस,  उडीद आदी शेतमालाला भाव मिळावा यासाठी झगडत आहे. या  शेतमालाला आघाडी सरकारच्या काळात मिळत असलेल्या  भावाच्या निम्मा भावदेखील भाजपा सरकारकडून सोयाबीनला  मिळत नाही, ही वस्तुस्थिती असल्याने शेतकर्‍यांच्या मनात तीव्र  असंतोष खदखदत आहे.

ठळक मुद्दे भ्रष्टाचार पुराव्यानिशी सिद्ध करण्याचे संचालकांचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: महाराष्ट्रातील शेतकरी आजरोजी सोयाबीन, तूर, ऊस,  उडीद आदी शेतमालाला भाव मिळावा यासाठी झगडत आहे. या  शेतमालाला आघाडी सरकारच्या काळात मिळत असलेल्या  भावाच्या निम्मा भावदेखील भाजपा सरकारकडून सोयाबीनला  मिळत नाही, ही वस्तुस्थिती असल्याने शेतकर्‍यांच्या मनात तीव्र  असंतोष खदखदत आहे, यापासून शेतकर्‍यांचे लक्ष विचलित  करण्यासाठीच बाजार समितीकडे शेतकर्‍यांच्या निवास व  नाममात्र दरात भोजनाची मागणी करण्याचा पुळका श्‍वेता महाले  दाखवित असून, त्यांनी बाजार समितीवर केलेले आरोप  पुराव्यानिशी सिद्ध करावे, असे आव्हान बाजार समिती सभापती,  उपसभापतींसह संचालकांनी दिले आहे.श्‍वेता महाले यांनी केलेली मागणी व बाजार समिती प्रशासनावर  केलेल्या आरोपाच्या पृष्ठभूमीवर बाजार समिती संचालकांनी ६  नोव्हेंबर रोजी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे महाले यांना हे आवाहन  केले आहे. यानुषंगाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात  आले आहे की, चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शे तकर्‍यांना निवास व नाममात्र दरात भोजन देण्याबाबत यापूर्वी पासून माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व आ. राहुल बोंद्रे यांच्या  मार्गदर्शक सूचनेवरून समिती प्रशासन प्रयत्नशील आहे व य थावकाश त्याबाबत कारवाई ही होणारच आहे. मात्र, तत्पूर्वी शेतकर्‍यांना समितीतील निवास व भोजनाऐवजी  सर्व कुटुंबाच्या पालनपोषणासाठी आपल्या शेतमालाला योग्य  भाव हवा आहे. तो सरकारने द्यावा जेणेकरून, जगाला पोसणार्‍या शेतकर्‍याला  अशा नाममात्र दरातील भोजनाची गरज भासणार नाही आणि  यासाठी श्‍वेता महाले यांनी त्यांचे वजन सरकार दरबारी वापरावे  व तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम शेतकर्‍यांना दिलासा  द्यावा, असे आवाहन करण्यासोबतच, शेतकर्‍यांप्रती पुळका  दर्शविणार्‍या व बाजार समिती राजकारण व भ्रष्टाचाराचा अड्डा  बनल्याचा आरोप करणार्‍या महाले यांनी भाजपाची राज्यात व  केंद्रात सत्ता असल्याने या सत्तेचा सदुपयोग घेऊन समितीत  भ्रष्टाचार उघडीस आणावा. भ्रष्ट पदाधिकारी व संचालकांवर  कारवाई करून बाजार समिती बरखास्त करावी, केवळ प्रसिद्धी  माध्यमांत सवंग प्रसिद्धीसाठी बिनबुडाचे आरोप करू नयेत, वास् तवात भाजपाच शेतकर्‍यांप्रती खोटा कळवळा दाखवित असून,  शेतमालाला अशाच प्रकारे कमी भाव देत राहिलात तर खरोखरच  शेतकर्‍यांना स्वत:चे घरदार विकून देशोधडीला लागावे लागणार  आणि त्यांना निवास व नाममात्र दरातील भोजनाची गरज  भासणार असल्याची बहुधा महाले यांना जाणीव झाली  असल्यानेच त्यांनी ही मागणी केली असावी, अशी उपरोधीत  टीकादेखील बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, उ पसभापती ज्ञानेश्‍वर सुरूशे, संचालक विष्णू पाटील, सचिन  शिंगणे, संजय गाडेकर, विजय शेजोळ, रूपराव सावळे, अशोक  मगर, राजू जावळे, सुमन म्हस्के, पुष्पा पडघान, ईश्‍वर इंगळे,  गजानन मोरे, दीपक जाधव, गजानन पवार, मनोज खेडेकर आदी  संचालकांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMarketबाजार