शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधनानिमित्त एसटी सोडणार जादा बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 17:00 IST

बहिणींना ‘रक्षाबंधना’ची भेट म्हणून राज्य परिवहन मंडळाने जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: बहिणींना ‘रक्षाबंधना’ची भेट म्हणून राज्य परिवहन मंडळाने जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे.  बुलडाणा जिल्ह्यातील सातही आगारातून दैनंदिन किलोमीटरच्या दहाटक्के जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. यामध्ये लांब पल्ल्याच्या वाहतुकीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे समजते. त्याचप्रमाणे अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील ९ आगारांकडूनही जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.'रक्षाबंधन'निमित्तएसटी  महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी  आगार निहाय स्थानिक पातळीवर जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, खामगाव, शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद, मेहकर आणि चिखली या सातही आगारासोबतच देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, नांदुरा, मोताळा आणि लोणार या वाहतूक नियत्रंण केंद्रावरूनही जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये गुरूवारी दैनंदिन वाहतुकीच्या तुलनेत दहा ते १२ टक्के जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांना यामध्ये प्राधान्य दिल्या जाणार असून त्या दृष्टीकोनातून प्रत्येक आगारातून अतिरिक्त वाहतुकीचे नियोजन केले आहे.

 एसटी कर्मचाºयांच्या रजा बंद!रक्षाबंधनानिमित्त प्रवाशांना अतिरिक्त सुविधा देण्यासाठी एसटी महामंडळातील चालक-वाहकांसोबतच कार्यालयीन कर्मचाºयांच्या रजा यापार्श्वभूमीवर बंद करण्यात आल्याची माहिती आहे. रक्षाबंधन सणाच्या कालावधीत   सर्व एसटी कर्मचारी रजा न घेता अहोरात्र काम करुन प्रवाशांना सुरक्षित व वक्तशिर सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे समजते. यासाठी एसटी बसस्थानके, बस थांब्यावर वरिष्ठ अधिकाºयांच्या देखरेखीखाली कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. रक्षा बंधनानिमित्त प्रवाशांना एसटी सेवेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :khamgaonखामगावstate transportएसटीRaksha Bandhanरक्षाबंधन