शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

विस्तार अधिकाऱ्यास लाच स्वीकारताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 11:05 IST

नांदुरा पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी सदाशीव सावजी सपकाळ (५६, रा. बन्सीलाल नगर, मलकापूर) यास रंगेहात पकडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ग्रामपंचायतीच्या मासिक सभा, ग्राम सभा तथा शिल्लकेचा तपशील सादर नाही केला म्हणून कर्तव्यात कसूर केल्याचा अहवाल वरिष्ठांना न पाठविण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नांदुरा पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी सदाशीव सावजी सपकाळ (५६, रा. बन्सीलाल नगर, मलकापूर) यास रंगेहात पकडले आहे. २३ जून रोजी दुपारी ही कारवाई बुलडाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.दरम्यान, संबंधितांकडून रकमेची पाच हजार रुपये रक्कमही जप्त करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील शेलसूर येथील एका नोकरी करणाºया व्यक्तीस ही मागणी विस्तार अधिकारी (वर्ग तीन) सदाशिव सपकाळ यांनी केली होती. प्रकरणी संबंधीत व्यक्तीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता पंचा समक्ष विस्तार अधिकारी सदाशीव सपकाळ यांनी पाच हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुषंगाने प्रत्यक्ष सापळा रचण्यात आला असता नांदुरा बसस्थानकावर पाच हजार रुपये स्वीकारतांना सदाशीव सपकाळ यांना रंगेहात पकडण्यात आले. दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे.लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अपअधीक्षक आर. एन. मळघणे, पोलिस नायक विलास साखरे, मोहम्मद रिजवान, पोलिस कॉन्स्टेबल विजय मेहेत्रे, जगदीश पवार, चालक मधुकर रगड व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :NanduraनांदूराAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग