शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

बुलडाणा जिल्ह्यातील प्रवासी बस फेर्‍यांचे नियोजन कोलमडले; प्रवासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 01:07 IST

बसगाड्यांचे वेळापत्रक सात त्याने कोलमडत असल्याने प्रवाशांचा रोष एसटी चालक व वाहकाच्या मुळावर  आला की काय., अशा शंका उपस्थित होत आहेत. या विलंबामुळे प्रवाशांचाही  संयमाचा बांध सुटत असून,  बुलडाण्यात वाहकास प्रवाशांकडून मारहाण तर  मेहकर आगारातूनही वेळेवर बस सोडल्या जात नसल्याने संतप्त प्रवाशांनी च क्क बसच्या काचा फोडल्याचा प्रकार समोर आला.

ठळक मुद्देबुलडाणा बसस्थानकावर वाहकास मारहाण शहापूरनजीक बसच्या काचा फोडल्या

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : एकीकडे प्रवाशांसाठी दर्जेदार सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून  शिवशाहीसारखी आधुनिक बस बुलडाणा जिल्ह्याच्या ताफ्यात दाखल होत  आहे; मात्र दुसरीकडे स्थानकांमधून सुटणार्‍या बसगाड्यांचे वेळापत्रक सात त्याने कोलमडत असल्याने प्रवाशांचा रोष एसटी चालक व वाहकाच्या मुळावर  आला की काय., अशा शंका उपस्थित होत आहेत. या विलंबामुळे प्रवाशांचाही  संयमाचा बांध सुटत असून,  बुलडाण्यात वाहकास प्रवाशांकडून मारहाण तर  मेहकर आगारातूनही वेळेवर बस सोडल्या जात नसल्याने संतप्त प्रवाशांनी चक्क बसच्या काचा फोडल्याचा प्रकार समोर आला.‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन  १९४८ पासून अविरत धावत  असलेल्या एसटी बसवर आजही सर्वसामान्य प्रवाशांची मदार आहे. राज्य  परिवहन महामंडळात वेगवेगळे बदल होत आहेत; परंतु वाहन चालक व  वाहकांची कमतरता असल्याने अनेक बसगाड्या वेळेवर सुटत नसल्याचे  प्रमाण जिल्ह्यातील सर्वच आगारामध्ये वाढलेले आहे. लांब पल्ल्याच्या  बसफेर्‍यांपासून ग्रामीण भागात जाणार्‍या बसगाड्यासुद्धा वेळेवर जात नसल्याने  प्रवाशांची तारांबळ उडते. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा  लागत आहे. यात ज्या ठिकाणी खासगी वाहने पोहोचत नाहीत, अशा प्रवाशांना  एसटी बसस्थानकावरच बसच्या प्रतीक्षेत तासन्तास बसावे लागते.  ‘जनसामान्यांसाठी रस्ता तेथे एसटी’ यावर राज्य परिवहन महामंडळची बस  सुरू आहे; मात्र बुलडाणा जिल्ह्यातील परिस्थिती वेगळीच झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांश गावामध्ये आजही बसफेरी पोहोचत नाही.  ज्या गावांमध्ये  बसफेरी सुरू आहे, त्या बसगाड्यांचेही नियोजन कोलमडत असल्याने  प्रवाशांचा राज्य परिवहन महामंडळाप्रती रोष वाढत आहे. प्रवाशांचा हा रोष  एसटी चालक व वाहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. 

गावात बस उशिरा आणली म्हणून काचा फोडल्याडोणगाव : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शहापूर येथे २ डिसेंबर रोजी  बस उशिरा आणण्याच्या कारणावरुन बसच्या काचा फोडून नुकसान केल्याची  घटना घडली. शहापूर बसस्थानकावर २ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता  मेहकरवरून बस आली असता आरोपी भागवत बोडखे व आकाश काळे यांनी  चालक शे.रफिक शे.कादर यांच्याशी वाद घालून तुम्ही एसटी बस उशिरा का  आणली, या कारणावरून एसटी बसच्या काचा फोडल्या. चालकाच्या  तक्रारीवरून उपरोक्त दोघांविरोधात शासकीय कामात अडथळा आणण्यासोब तच अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील त पास सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक नरोटे पुढील तपास करीत आहेत.

एसटीचे नुकसानोहकर आगारातून नेहमी बसफेर्‍या वेळेवर न जाण्याचे प्रकार घडतात. तसेच  मेहकर येथे शिक्षणासाठी येणार्‍या मुलींनासुद्धा सायंकाळी घरी जाण्याकरिता  वेळेवर बस उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातील मुलींना रात्री अंधार  पडल्यानंतरही बसस्थानकवर बसून बसची प्रतीक्षा करावी लागते. मेहकर  तालुक्यातील शहापूर येथील बस वेळेवर न आल्याने काही प्रवाशांनी शहापूर  येथे बसच्या काचा फोडल्या. 

सर्व आगारामधून नियोजित वेळेवर बसफेरी सोडण्याचा प्रयत्न केला जातो;  मात्र जिल्ह्यात एसटीकडे वाहकांची कमतरता असल्याने काही बस वेळेवर  पोहोचण्यास अडचणी जातात. - ए.यू. कच्छवे, विभागीय वाहतूक अधिकारी, बुलडाणा.  

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळbuldhana residenceबुलडाणा रेसीडन्सी